मारापूर येथील खंडोबा मंदिर सभामंडपासाठी दहा लाख रुपये मंजूर:- विनायक यादव
------------------------------------------------------------------------------------
मंगळवेढ(दै.पंढरी नगरी न्यूज) : तालुक्यातील मारापूर समाजकारण आणि राजकारण या सेवाभावी क्षेत्राची दिशा ठरविण्यात आपला गाव नेहमीच अग्रेसर आणि महत्वपूर्ण भूमिकेत आहे.
अशी विधायक कार्याची परंपरा अधोरेखित करणाऱ्या गावामध्ये खंडोबा देवस्थानाने गावाच्या भक्ती आणि शक्ती आराधन साधनेला वेगळाच आयाम प्रस्थापित करून दिला आहे. सर्व गावकऱ्यांच्या भक्तीचे अढळ स्थान असणाऱ्या सदर मंदिराचे सभामंडप उभारणीसाठी खा. डॉ. जय सिद्धेश्वर महास्वामी यांचे मार्गदर्शन खाली , पंढरपूर - मंगळवेढा विधानसभा मतदारसंघाचे विकासरत्न आमदार समाधानदादा आवताडे यांनी ग्रामस्थांची तळमळ आणि पाठपुरावा यांची दखल घेऊन तब्बल १० लाख रुपये मंजूर केले. व मारापुर रस्ता ते स्मशानभूमीपर्यंत चा रस्त्या साठी ७ लाख व गावठाण अंतर्गत पेवरब्लॉक रस्त्यासाठी ३ लाख मंजूर करण्यात आले.
विद्यमान आमदार यांच्या राजकीय कारकीर्दपासून त्यांच्या सार्वजनिक कार्यामध्ये एकदिलाने ताकद देणाऱ्या तमाम मारापुरकरांची आमदार महोदय यांनी केलेली कदर नक्कीच कौतुकाची नांदी आहे. त्यांच्या या विकास कामाबद्दल ग्रामपंचायतचे विद्यमान सरपंच विनायक यादव, उपसरपंच सौ. सुवर्णा आसबे, युवा उद्योजक राजकुमार यादव, आबासाहेब जानकर, बाळासो यादव व सर्व ग्रामपंचायत सदस्य व ग्रामस्थ यांनी आभार मानले.