मोठी बातमी : महसूल प्रशासनातील गैरप्रकार रोखण्यासाठी तलाठी भाऊसाहेबांच्या बदल्या आत्ता ऑनलाइन पद्धतीने होणार... लवकरच अध्यादेश निघणार ,

मोठी बातमी : महसूल प्रशासनातील गैरप्रकार रोखण्यासाठी तलाठी भाऊसाहेबांच्या बदल्या आत्ता ऑनलाइन पद्धतीने होणार...  लवकरच अध्यादेश निघणार ,

------------------------------------------------------------------------------------

सोलापूर( दै.पंढरी नगरी न्यूज)महसूल विभागातील तलाठी बदल्यांमधील गैरप्रकार, वशिलेबाजी रोखण्यासाठी राज्य शासनाने पुढाकार घेतला आहे. आता शासनाने तलाठ्यांच्या बदल्या ऑनलाइन पद्धतीने करण्याचा निर्णय घेतला असून, त्यासाठी अभ्यास गटाची स्थापना केली आहे.पुनर्रचना होऊन एका उपविभागीय अधिकारी कार्यालयांतर्गत एक किंवा दोन तालुक्यांचे कार्यक्षेत्र निश्चित केले आहे. तलाठी या संवर्गाची आस्थापना उपविभागीय कार्यालयाच्या स्तरावर असून, आस्थापनाविषयक बाबी, बिंदूनामावली, बदली आदींबाबत उपविभागीय अधिकारी स्तरावर कार्यवाही करण्यात येते.