श्री विठ्ठल - रुक्मिणी मंदिर समितीच्या कर्मचाऱ्यांच्या मागण्या मार्गी लावणार - आमदार, समाधान आवताडे,
------------------------------------------------------------------------------------
पंढरपूर( दै.पंढरी नगरी न्यूज ) : श्री विठ्ठल रुक्मिणी मंदिरे समिती पंढरपूर आस्थापनेवरील कर्मचाऱ्यांच्या सेवा ७ ते ३० वर्षे झालेले आहेत. सदर कर्मचाऱ्यांना शासन नियमाप्रमाणे महागाई भत्ता व घर भाडे भत्ता न देण्यात आल्याने कर्मचाऱ्यांना तुटपुंज्या पगारावर काम करावे लागत आहे. कर्मचाऱ्यांच्या वेळोवेळी निर्गमित होणाऱ्या शासन नियमाप्रमाणे महागाई भत्ता व घर भाडे भत्ता देण्याबाबत प्रस्ताव तयार करून धर्मदाय आयुक्त मुंबई यांना सादर केला आहे. तरी प्रस्तावावर सहानुभूतीपूर्वक निर्णय करून मंदिर समितीच्या कर्मचाऱ्यांना योग्य तो न्याय द्यावा अशी मागणी आमदार अवताडे यांनी मुख्यमंत्री ना. एकनाथ शिंदे यांच्याकडे केली असून हा प्रश्नही मार्गी लावण्याचे आश्वासन मुख्यमंत्री शिंदे यांनी दिल्याचे आ आवताडे यांनी सांगितले.