राज्यसभेच्या नवनिर्वाचित खासदारपदी सुनेत्रा पवार यांच्या निवडीबद्दल राष्ट्रवादीचे नेते चेअरमन कल्याणराव काळे यांनी केला स्वागत पर सत्कार

राज्यसभेच्या नवनिर्वाचित खासदारपदी सुनेत्रा पवार यांच्या निवडीबद्दल राष्ट्रवादीचे नेते चेअरमन कल्याणराव काळे यांनी केला स्वागत पर सत्कार

-----------------------------------------------------------------------------------

पंढरपूर (दै.पंढरी नगरी न्यूज) राष्ट्रवादी काँग्रेसच्या (अजित पवार गट) राज्यसभेच्या नवनिर्वाचित खासदारपदी बिनविरोध निवडून आल्याबद्दल सुनेत्रा अजित पवार वहिनी यांचा सत्कार पुणे येथील जिजाई निवास्थानी सोलापूर राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे प्रांतिक सदस्य तथा सहकार शिरोमणी वसंतराव काळे सहकारी साखर कारखान्याचे चेअरमन कल्याणराव काळे यांनी अभिनंदन करून व पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या.

त्यामुळे कल्याणराव काळे व उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे राजकीय जवळचे संबंध निर्माण झाल्याचे दिसून येत आहे .याचा फायदा राष्ट्रवादीचे नेते तथा चेअरमन कल्याणराव काळे यांना निश्चित होणार आहे.

याप्रसंगी राज्यसभेच्या नवनिर्वाचित खासदार सुनेत्रा पवार वहिनींना सोलापूर जिल्हयातील पक्षवाढीच्या अडी-अडचणीबाबत सखोल चर्चा करुन त्यांना पंढरपूरच्या श्रीविठठल- रुक्मिणीच्या दर्शनासाठी येण्याचे निमंत्रणही काळे यांनी दिले.