पंढरपूर -मंगळवेढा मतदारसंघाचे आमदार समाधान आवताडे सोमवारच्या आठवडी बाजारात अचानक दाखल, शेतकरी व व्यापाऱ्याकडून जाणून घेतल्या समस्या , नगरपालिकेकडून सुख सुविधेचा अभाव ,प्रशासनाचा कारभार ढसाळ, शेतकरी व्यापारी संतप्त, नगरपालिकेच्या कामचुकार अधिकाऱ्यांची पळता भुई थोडी
------------------------------------------------------------------------------------
मंगळवेढा( दै पंढरी नगरी न्यूज) मंगळवेढा शहरामध्ये भरत असलेल्या आठवडी बाजार मध्ये नागरिकांच्या सोयी सुविधा कशा आहेत हे पाहण्यासाठी आमदार समाधान आवताडे यांनी मंगळवेढा येथील सोमवार आठवडा बाजार दिवशी पाहणी करून व्यापाऱ्यांना,शेतकऱ्यांना व ग्राहकांना गैरसोयींना सामोरे जावे लागत असल्याचे आमदार आवताडे यांचे लक्ष्यात आल्यानंतर त्यांनी नगरपालिकेच्या अधिकाऱ्यांना चांगलेच फैलावर घेतले व्यापारांसाठी व शेतकऱ्यांसाठी बांधलेल्या बाजार कट्ट्यावर अनेकांनी खोकी टाकली आहेत, वाहने लावले आहेत व शेतकऱ्यांना खाली चिखलात बसावे लागत आहे याबाबत नगरपालिकेच्या प्रशासनास जाब विचारत तुमचे बाजारवर व कामावर लक्ष असते का? ग्रामीण भागातून बाजार साठी व खरेदीसाठी येणाऱ्या नागरिकांना अजिबात त्रास होता कामा नये,अशा शब्दात मुख्याधिकाऱ्यांची कान उघडणी केली.

सध्या पाऊस सुरू असल्यामुळे बाजार आवारामध्ये अनेक ठिकाणी पाणी साचले आहे पूर्ण बाजारामध्ये सिमेंट काँक्रीट केले असतानाही त्यावर नगरपालिकेने मुरूम टाकून अकलेचे तारे तोडले आहेत अनेक ठिकाणी पाणी साठत असून भाजीपाला विक्रीसाठी शेतकऱ्यांना बसण्यास अडचणी होत आहेत. त्यामुळे बाजार कट्ट्यावरील केलेले अतिक्रमण काढून बाजार व्यवस्थित शेडमध्ये भरवण्याच्या सूचना प्रशासनास दिल्या. त्याचबरोबर व्यापारी महिला व बाजारला येणाऱ्या ग्राहकांना स्वच्छतागृहाची सोय नसल्यामुळे त्यांची कुचंबणा होत आहे त्यावरही ताबडतोब उपाययोजना करा त्याचबरोबर आठवडा बाजार मध्ये अजून काही निधीची कमतरता आहे का?
आठवडा बाजार मध्ये साठत असलेले पाणी बाहेर काढण्यासाठी काय उपाययोजना कराव्या लागतात याबाबत सविस्तर प्रस्ताव सादर करून द्या ताबडतोब निधीच्या तरतूद करतो मात्र शेतकऱ्यांचे होणारे हाल कदापिही सहन करणार नाही अशा शब्दात नगरपालिका प्रशासनास सुनावले. बाजारला येणाऱ्या ग्राहकांच्या वाहनास व्यवस्थित पार्किंगची सोय नगरपालिकेकडून करण्यात आली नाही रस्त्यावर वाहने लावून वाहतुकीस अडथळा होत आहे .याबाबत पोलीस प्रशासनाची खडसावून वाहतूक व्यवस्था सुरळीत करण्याचा सूचना दिल्या.
आमदार समाधान आवताडे यांनी अचानक आठवडा बाजार मध्ये जाऊन पाहणी करत व्यापारी ग्राहक यांचे विचारपूस केली त्यावेळेस पोलीस प्रशासन व नगरपालिका प्रशासन यांची तारांबळ उडाली. आमदार समाधान आवताडे यांनी सोमवार आठवडी बाजार ची प्रत्यक्ष पाहणी करून अधिकाऱ्यांना ग्रामीण व शहरी भागातील शेतकऱ्यांच्या गैरसोयी बाबत उपाययोजना करण्याबाबतच्या सूचना दिल्यामुळे शेतकरी व व्यापारी वर्गाकडून आमदार आवताडे यांचे कौतुक होत आहे, यावेळी त्यांच्यासोबत प्रशासन अधिकारी साळुंखे, उपनगराध्यक्ष चंद्रकांत पडवळे,शेतकरी संघटनेचे युवराज घुले,पोलीस निरीक्षक रणजीत माने,महादेव जाधव,सचिन शिंदे उपस्थित होते.
मंगळवेढा शहरासाठी कोट्यावधीचा निधी आणला असून अद्याप टेंडर होऊनही काही ठेकेदाराने कामे सुरू केली नाहीत ती कामे तात्काळ सुरू करावीत जे ठेकेदार कामे सुरू करत नाहीत त्यांच्यावर कारवाई करा पण तात्काळ कामे सुरू करा असा सूचनाही आमदार समाधान आवताडे यांनी नगरपालिका प्रशासन दिल्या.