स्वच्छतेचा संदेश देणाऱ्या पंचायत समितीतच महिलांची कुचंबना.. स्वतंत्र शौचालय नसल्याने महिलांना सहन करावा लागतोय नाहक त्रास.. राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाच्या महिला अध्यक्ष वर्षा शिंदे यांनी दिला इशारा...
___________________________________________________
पंढरपूर( दै.पंढरी नगरी न्यूज) पत्रकार- नवनाथ खिलारे... महाराष्ट्राचे आराध्य दैवत असलेल्या श्री विठ्ठल रुक्मिणी च्या पंढरी नगरीत आषाढी वारीच्या दरम्यान स्वच्छता दिंडीच्या माध्यमातून संपूर्ण राज्यभरातील येणाऱ्या भाविकांना स्वच्छतेचा संदेश देणाऱ्या पंढरपूर पंचायत समितीत तसेच पंढरपूर शहरातील ठिक ठिकाणी महिलांची कुचंबना होताना दिसत आहे. पंढरपूर शहरात ग्रामीण भागातून तसेच शहरातील विविध कामानिमित्त शहरात येतात तसेच आणि हजारो महिला भाविक पंढरपूर मध्ये दर्शनासाठी येतात परंतु या ठिकाणी शेकडो महिलांना शौचालयाची पुरेशी सोय नसल्याने मोठ्या प्रमाणात नाहक त्रास सहन करावा लागत आहे. मात्र असे असले तरी नगरपालिका आणि पंचायत समितीकडून गेल्या अनेक वर्षात यावर कसलीही ठोस पावले उचलली जात नसल्याने केवळ दिखाव्यासाठी स्वच्छता दिंडी काढली जाते का असा प्रश्न महिला वर्गातून उपस्थित केला जात आहे.
पंढरपूर पंचायत समिती ही श्री विठ्ठल रुक्मिणी देवस्थानामुळे संपूर्ण राज्यभरातून येणाऱ्या भाविक भक्तांना परिचीत असलेली पंचायत समिती आहे. या पंचायत समिती मार्फत आषाढी तसेच कार्तिकी वारीच्या दरम्यान स्वच्छता दिंडीच्या मार्फत थेट मुख्यमंत्री किंवा उपमुख्यमंत्र्यांच्या हस्ते या दिंडीचा शुभारंभ करून संपूर्ण राज्यभरातील भाविक भक्तांसाठी स्वच्छतेचा संदेश दिला जातो. तसेच स्वच्छतेच्या कामांसाठी दरवर्षी कोट्यावधी रुपयांचा खर्चही केला जातो. तर दुसरीकडे मात्र पंचायत समितीच्या दुर्लक्षामुळे येथे कामासाठी येणाऱ्या शेकडो महिलांना शौचालयाची पुरेशी सोयच नसल्याने मोठी कुचंबना व त्रास सहन करावा लागत आहे. पंचायत समितीच्या पाठीमागील बाजूस पुरुषांसाठी मुतारीची तसेच शौचालयाची सोय आहे. मात्र याचवेळी महिलांसाठी केवळ एकच शौचालय असून तेही जीर्ण व बंद अवस्थेत असलेले दिसून येत आहे. त्यामुळे महिलांची होणारी ही गैरसोय पंचायत समिती आणि नगरपालिका कधी थांबवणार असा प्रश्न या निमित्ताने उपस्थित केला जात आहे.
यावेळी सोलापूर जिल्हा महिला अध्यक्षा वर्षाताई शिंदे यांनी सर्व ठिकाणाची पाहणी करून पंढरपूर पंचायत समितीचे गटविकास अधिकारी व पंढरपूर नगरपालिकेचे सीओ यांना भेटून निवेदन देण्यात आले यावेळी त्यांनी शहरातील वरदळीच्या प्रमुख ठिकाणांची पाहणी करून तशी सूचना सर्व अधिकाऱ्यांना देण्यात आल्या आगामी येणाऱ्या आषाढी सोहळ्याच्या अगोदर सर्व सुविधा महिलांसाठी उपलब्ध करून द्याव्यात. यावेळी त्यांच्या समवेतराष्ट्रवादी काँग्रेस पार्टी जिल्हाध्यक्ष सोलापूर वर्षाताई रमेश शिंदे, तालुकाध्यक्ष एडवोकेट सुकेश नि बागल, तालुका उपाध्यक्ष रूपाली रंधवे, रेखा यादव, तालुका सदस्य वर्षा भोसले,इ उपस्थित होते.