रविकांत तुपकरांची स्वाभिमानी संघटनेकडून हकालपट्टी.. तुपकरांनी घेतला 'हा' मोठा निर्णय, गद्दारी भोवली कार्यकर्त्यातून चर्चा

रविकांत तुपकरांची स्वाभिमानी संघटनेकडून हकालपट्टी..   तुपकरांनी घेतला 'हा' मोठा निर्णय, गद्दारी भोवली कार्यकर्त्यातून चर्चा

-----------------------------------------------------------------------------------

कोल्हापूर (दै.पंढरी नगरी न्यूज ) शेतकरी चळवळीतील युवा चेहरा आणि आक्रमक नेतृत्व म्हणून ओळख असलेल्या रविकांत तुपकर यांची स्वाभिमानी शेतकरी संघटनेतून हकालपट्टी केलीय. रविकांत तुपकर यांनी प्रमुख नेते राजू शेट्टी यांच्यावर मोठे आरोप केले होते.त्या आरोपावर तसेच रविकांत तुपकर यांच्यासंदर्भात एक समिती नेमण्यात आली होती. त्यातच आज समितीने पत्रकार परिषद घेऊन रविकांत तुपकर यांना पक्षातून बरखास्त करण्याचा निर्णय घेतला आहे. यानंतर रविकांत तुपकर यांनी बुधवारी २४ जुलैला महत्वाची बैठक बोलवली आहे.

संघटनेच्या कोणत्याही बैठकीत चर्चा सत्रात रविकांत तुपकर यांनी हजेरी लावली नाही. त्यांनी पक्षाच्या विरोधात निर्णय घेतला आहे. तसेच संघटनेशी संबंधित त्यांनी कोणतंही काम केलं नाही. त्यामुळे त्यांचा आणि संघटनेशी काहीही संबंध राहणार नाही. असं स्वाभिमानी संघटनेने जाहिर केलं आहे.

त्यानंतर शेतकरी चळवळीची पुढील दिशा ठरविण्यासाठी महत्वपूर्ण बैठक पुण्यातील एस.एम. जोशी फाऊंडेशन सभागृह येथे पदाधिकाऱ्यांची रविंकात तुपकर यांनी बैठक बोलवली आहे. या बैठकीसाठी राज्यातील विविध जिल्ह्यातील चळवळीतील प्रमुख नेते, कार्यकर्त्यांची महत्वपूर्ण बैठक आयोजित केली आहे. या बैठकीत विचारमंथन करून चळवळीची पुढील दिशा ठरवायची आहे. असंही त्यांनी सांगितलं आहे.