भोसे येथील यशवंत विद्यालयात साहित्यरत्न अण्णाभाऊ साठे व लोकमान्य टिळक यांची जयंती उत्साहात साजरी, विद्यार्थीनी वैष्णवी व्यवहारे हिच्या पोवाडा गायनाने रसिक मंत्रमुग्ध

भोसे येथील यशवंत विद्यालयात साहित्यरत्न अण्णाभाऊ साठे व लोकमान्य टिळक यांची जयंती उत्साहात साजरी,  विद्यार्थीनी  वैष्णवी व्यवहारे हिच्या पोवाडा गायनाने रसिक  मंत्रमुग्ध

------------------------------------------------------------------------------------

पंढरपूर (दै.पंढरी नगरी न्यूज) पंढरपूर तालुक्यातील भोसे(कं) येथील यशवंत विद्यालयात लोकमान्य टिळक यांची १०४ वी पुण्यतिथी व शाहीर अण्णाभाऊ साठे यांची १०४ वी जयंती मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली.

सकाळी वेळी दोन्हींही महापुरुषांच्या प्रतिमेस विदयार्थी, प्रशालेचे प्रभारी मुख्याध्यापक श्री शिंदे के.डी, ज्येष्ठ शिक्षक श्री भोसले ए.आर, ज्युनिअर कॉलेज विभागप्रमुख श्री उबाळे एन.जी, गुरुकूल प्रमुख श्री ढेरे जे. एस श्री सपाटे एस. एन,श्री कदम ए.आर, श्री माने आर.डी,श्री खैरे पी. जी आदिंनी पुष्पांजली अर्पण केली.

कार्यक्रमाचे अध्यक्ष मा. श्री. भोसले ए.आर सर. इयत्ता ५ वी ते १० वी च्या विद्यार्थ्यांनी भाषणे केली. शिक्षक मनोगत- श्री. उबाळे एन. जी सर. सूत्रसंचालन- श्री. पावले यु.एस.फोटोग्राफी व चित्रीकरण- श्री. पाटील वाय. बीउपस्थित सर्व विद्यार्थी व शिक्षकवृंद. वैष्णवी व्यवहारे या विद्यार्थीनीने लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांच्यावर पोवाडा सादर केला.

तिच्या भाषण कलेचे कौतुक बक्षीसपर श्री. उबाळे सर, श्री खैरे सर, श्री. करळे एस.पी सर यांनी प्रत्येकी ५० रुपये बक्षीस देवून सत्कार केला.