गारपिटग्रस्त शेतकऱ्यांना त्वरीत दिलासा द्या - रणजित बागल , शिवसेना उध्दव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे तहसीलदारांना निवेदन

गारपिटग्रस्त शेतकऱ्यांना त्वरीत दिलासा द्या - रणजित बागल , शिवसेना उध्दव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे तहसीलदारांना निवेदन

-----------------------------------------------------------------------------------

पंढरपूर( दै.पंढरी नगरी न्यूज) : गेल्या चार दिवसांपासून पंढरपूर तालुक्यासह राज्यभरात ठिकठिकाणी मोठ्या प्रमाणात वादळवारा व गारपीट झाली आहे, यामध्ये फळबाग उत्पादक शेतकरी तसेच भाजीपाला व शेतीमाल उत्पादक शेतकऱ्यांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे, ऐन उन्हाळ्यात गारपीट झाल्यामुळे शेतीपिकांचे व तसेच जनावरे व पशुधन यांचे झालेले नुकसान हे न भरून निघणारे आहे, तरी सरकारने वादळवारा व गारपीट झालेल्या भागात पंचनामे करण्यात वेळ काढु धोरण न अवलंबता त्वरीत नुकसानीचे पंचनामे करून शासनाकडून त्या बाधित शेतकऱ्यांना योग्य ती मदत मिळवुन द्यावी, अशी मागणी करत मदत न मिळाल्यास आगामी काळात शिवसेना उध्दव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या वतीने त्या शेतकर्‍यांना सोबत घेवुन तीव्र आंदोलन करण्यात येईल असा इशारा शिवसेना युवासेनेचे युवानेते रणजित बागल यांनी दिला आहे. शेतकर्‍यांना तातडीने योग्य ती दिलासादायक मदत मिळाली पाहिजे, शेतकरी वारंवार अनेक अडचणीमुळे हैराण आहे आता त्यातच नैसर्गिक संकटाची भर पडली आहे, या गारपीटीमुळे शेतकरी पुरता उध्वस्त झाला आहे, त्यांच्या संयमाचा अंत न बघता मोबदला द्यावा अन्यथा आम्ही रस्त्यावर उतरू असे घोडके यावेळी बोलताना म्हणाले.

यावेळी शिवसेना विभागप्रमुख उमेश काळे,विभागप्रमुख संजय कृष्णा घोडके,विभागप्रमुख बाळासाहेब पवार,विभागप्रमुख प्रशांत जाधव, भारत कदम,मा.उपतालुकाप्रमुख हरिश्चंद्र तळेकर, पितांबर कापसे, म्हमाजी भुसे,नंदकुमार भुत्ते,नामदेव चव्हाण, औदुंबर चव्हाण, सुखदेव कोरडे,वैभव ननवरे, विजय जाधव,नवनाथ सुरवसे,विलास कांबळे,प्रशांत आसबे,, युवासेना उपजिल्हा युवाअधिकारी पप्पू तांबोळी, उपजिल्हा युवा अधिकारी आकाश माने, उपतालुका युवाअधिकारी समाधान गोरे, शहरयुवाअधिकारी श्रीनिवास उपळकर, तालुकायुवाअधिकारी प्रणित पवार, शहर युवासेनेचे विशाल डोंगरे, सुरज कांबळे, सोमनाथ घोगरे, माऊली चव्हाण, आबासाहेब चव्हाण, दादा आसबे, उमेश धुमाळ, शंकर सुरवसे, एकनाथ चव्हाण यांच्यासह शिवसेना,युवासेना,महिला आघाडीचे सर्व पदाधिकारी कार्यकर्ते यांच्यासह आढीव ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.