माढा विधानसभा निवडणूक लढविण्यासाठी तालुका काँग्रेस कमिटीची जोरदार मोर्चे बांधणी सुरू माजी आमदार धनाजी साठे यांच्या प्रमुख उपस्थित काँग्रेस पदाधिकाऱ्यांची बैठक संपन्न, बैठकीत नगराध्यक्ष मिनलताई साठे यांच्या नावास एकमताने शिक्कामोर्तब
-----------------------------------------------------------------------------------
माढा (दै .पंढरी नगरी न्यूज) माढा विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर माढा तालुका काँग्रेस पदाधिकारी व साठे परिवारातील कार्यकर्त्यांची विचार विनिमय बैठक श्री संत कुर्मदास सहकारी साखर कारखान्याचे संस्थापक चेअरमन माजी आमदार धनाजीराव साठे यांच्या प्रमुख उपस्थितीत माढा येथील जगदाळे मंगल कार्यालयात संपन्न झाली.

यावेळी उपस्थित पदाधिकारी कार्यकर्त्यांशी संवाद साधला आणि सर्वांची मते जाणून घेतली. सर्वांनी एकजुटीने विधानसभा मतदारसंघावर काँग्रेस पक्षाचा झेंडा फडकवण्याचा निर्धार केला. माळशिरस- पंढरपूरहून आलेल्या अनेक पदाधिकाऱ्यांनी माजी आमदार धनाजी साठे यांनी साखर कारखानदारी चांगली चालवून शेतकऱ्याला मदत करून अडचणीतून बाहेर काढले असे सांगून माढा विधानसभा मतदारसंघात काँग्रेससाठी पोषक वातावरण असल्याचे अनेक कार्यकर्त्यांनी आपल्या भावना व्यक्त केल्या. नगराध्यक्ष मिनलताई साठे यांनी विधानसभा लढवावी असा निर्धार बैठकीत अनेक पदाधिकारी कार्यकर्त्यांनी व्यक्त केल्या. या बैठकीला मोठ्या प्रमाणात पदाधिकारी कार्यकर्त्यांनी मोठ्या प्रमाणात गर्दी केली होती.
यावेळी संत कुर्मदास सहकारी साखर कारखान्याचे चेअरमन दादासाहेब साठे, व्हाईस चेअरमन सुधीर पाटील, बी.डी. पाटील , माढा नगरपंचायतीच्या उपनगराध्यक्ष, कल्पनाताई जगदाळे , कारखान्याचे कार्यकारी संचालक झुंजारराव आसबे, कारखान्याचे सर्व संचालक मंडळ, माढा नगरपंचायतचे सभापती, नगरसेवक व नगरसेविका, माजी आमदार साठे गटाचे विविध गावचे सरपंच, उपसरपंच, सदस्य, सोसायटीचे चेअरमन, सदस्य ,विविध मंडळाचे पदाधिकारी सर्व साठे प्रेमी कार्यकर्ते, सर्व पत्रकार तसेच पंढरपूर व माळशिरस तालुक्यातून आलेले साठे गटाचे कार्यकर्ते मोठ्या प्रमाणात बैठकीला उपस्थित होते.