मातोश्री ईश्वराम्मा विद्यालयात दहावीचा निरोप समारंभ संपन्न.

मातोश्री ईश्वराम्मा विद्यालयात दहावीचा निरोप समारंभ संपन्न.

........................................................................................

पंढरपूर ( दैनिक , पंढरी नगरी न्यूज ) घेताना आज निरोप शाळेचा आले भरूनीया डोळे...... 

श्री. रुक्मिणी विद्यापीठ संचलित मातोश्री ईश्वराम्मा विद्यालयातील इ.10 वी.च्या विद्यार्थ्यांचा निरोप समारंभाची सुरूवात संस्थापक सचिवा सुनेत्राताई विजयसिंह पवार सो. यांचे शुभहस्ते सरस्वती पुजनाने करण्यात आली.

यावेळी विद्यार्थी मनोगतात म्हणाले कि कुंभार मडके घडवितो त्याप्रमाणे आम्हाला या शिक्षकांनी घडविले.या शाळेने आम्हाला उत्तम संस्कार देऊन आमच्या जीवनाला आकार दिला.आम्हाला शिस्त लावली.आमचा दंगा व चिवचिवाट सहन केला. तर विद्यार्थ्याना मार्गदर्शन करताना सुनेत्राताई पवार म्हणाल्या कि गुरु हा कुंभारासारखाच असतो असे सांगून भविष्यात विद्यार्थ्यांनी सकारात्मकते बरोबर आनंद घ्यावा. तसेच पाठ्यपुस्तका पलीकडील ज्ञान घ्यावे.व त्यावर चिंतन करावे. थोर पुरुषांचे विचार डोळ्यासमोर ठेवून त्यांचे प्रेरणेतून तुम्ही मेहनत शिस्त, पाळुन सातत्याने अभ्यास करण्यास सांगितले. शाळा ,कॉलेज व आई वडिलांचा नावलौकिक करण्याचे आवाहन केले.

प्राचार्या नंदिनी गायकवाड म्हणाल्या कि विद्यार्थ्यांनी जीवन जगत असताना जीवनातील बदलांना सकारात्मकतेने स्वीकारले पाहिजे.तसेच आई-वडिलांनी व गुरुजनांनी जो सन्मार्ग दाखविला. त्यावरूनच जीवनात यशस्वी व्हावे.जीवनात संकटे तर येतातच त्यावर मात करून एक चांगला संस्कारी जबाबदार नागरिक बनण्याचा बहुमोल संदेश यावेळी त्यांनी दिला.

इरफान शेख,माधुरी बोडके,विभावरी डुबल यांनीही मोलाचे मार्गदर्शन केले.

या कार्यक्रमात शालेय जीवनाची आठवण म्हणून प्रशालेस दोन फॅन भेट दिले.

कार्यक्रमासाठी सर्व शिक्षक शिक्षकेत्तर कर्मचारीवर्ग उपस्थित होता.

कार्यक्रमाचे सूत्रसंचलन निकीता कदम यांनी केले तर आभार कार्तिकी पाटील यांनी मानले. 

कार्यक्रम यशस्वीतेसाठी शंभु नवले, नागनाथ क्षीरसागर, सोहम भंडारे यांनी विशेष परिश्रम घेतले.