पंढरपुरात तहसीलदारच्या गाडीवर वाळू तस्करांची दगडफेक, वाळू माफियाची दादागिरी
------------------------------------------------------------------------------------
पंढरपूर( पंढरी नगरी न्यूज ) पंढरपूर तालुक्यातील गुरसाळे बंधारा येथील भीमा नदीच्या पात्रातील मोठ्या प्रमाणात वाळूची चोरी होत असल्याचे समजल्यानंतर पंढरपूर तहसील कार्यालयातील दक्षता पथक पहाटे चार वाजता अवैध वाळूची वाहतूक करणाऱ्या ट्रॅक्टरवर कारवाई करण्यासाठी गेलेल्या पंढरपूरच्या महसूल पथकातील कर्मचाऱ्यांना तलवारीचा धाक दाखवून हल्ला करण्यात आला आहे. ज्यात पथकाच्या गाडीवर दगडफेक करून गाडी फोडण्यात आली आहे. वाळू चोरी विरोधी दक्षता पथकातील महसूल कर्मचाऱ्यांना मात्र कोणतीही जखम झाली नसल्याने ते या घटनेपासून बचावले आहेत.
मात्र तहसीलदार यांच्या गाडीचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. वाळू चोरी विरोधी कारवाईसाठी गेलेल्या महसूलच्या पथकातील कर्मचारी व गाडीवर दगडफेक झाल्याची माहिती तातडीने तहसीलदार सचिन लंगुटे यांना समजल्यानंतर याबाबत तातडीने घडलेल्या घटनेची माहिती घेऊन कर्मचाऱ्यांची विचारपूस केली. पंढरपूरचे नूतन तहसीलदार सचिन लंगुटे यांनी पंढरपूर तालुक्यातील अवैध वाळू चोरी वाहतुकी करणाऱ्या वाळू चोरावर कडक कारवाईचे धोरण ठरविल्यामुळे अवैध वाळूची वाहतूक करणाऱ्या वाळू तस्करांमध्ये भीतीचे वातावरण या आठवड्यात निर्माण झाले होते त्यामुळे तालुक्यातील वाळू तस्करांमध्ये पंढरपूरचे नूतन तहसीलदार सचिन लंगुटे यांच्या विषयी वाळू चोरी कारवाई बाबत वाळू तस्करांमध्ये भीती निर्माण झाली होती.
पंढरपूर तालुक्यात अवैध वाळू उपसा करणाऱ्यांवर कारवाईसाठी गेलेल्या पथकावर थेट हल्ला करण्यात आला आहे. भीमा नदीच्या पात्रात बेकायदा वाळू उपसा करणाऱ्या वाळू माफियांवर तहसील पथक कारवाईसाठी गेले होते. दरम्यान, गुरसाळे येथे कारवाईला पथक आल्याचे लक्षात येताच वाळू माफियांनी चक्क हातात तलवार घेऊन पथकाला धमकावले. तसेच, जेसीबी आणि टीपर पळवून नेले. धक्कादायक म्हणजे कारवाईसाठी आलेल्या महसूल पथकाच्या गाडीवर दगडफेक करून गाडी फोडली. या घटनेने पंढरपूर तालुक्यात व परिसरात खळबळ उडाली असून पुन्हा एकदा वाळू माफियांची दहशत पाहायला मिळत आहे.
बंधाऱ्या नजीक गुरसाळे गावांमध्ये अवैध वाळूची वाहतूक करणाऱ्या ट्रॅक्टरवर कारवाई करण्यासाठी गेलेल्या महसूलच्या वाळू चोरी पथकाच्या गाडीवर वाळू तस्करानी दगडफेक केली आहे. या प्रकरणी पंढरपूर पोलीस ठाण्यामध्ये गुन्हा दाखल करण्यात आला आहे .वाळू वाहतुकीसाठी वापरण्यात आलेला टिपर महसूल पथकाने जप्त करून तो पंढरपूर येथील शासकीय गोडावनात जमा केला आहे.