खेडभोसे येथे विविध नामांकित कंपनीतील युवकांचा सन्मान

खेडभोसे येथे विविध नामांकित कंपनीतील युवकांचा सन्मान

-----------------------------------------------------------------------------------


पंढरपूर( प्रतिनिधी )पंढरपूर तालुक्यातील खेड भोसे येथे ग्रामस्थांच्या वतीने विविध क्षेत्रातील नामांकित कंपनीत या ठिकाणी विविध पदावर कार्यरत असलेल्या विद्वान रत्नांचा स्वागत पर सत्कार करण्यात आला .यावेळी संदीप सिद्धेश्वर पवार .मुंबई डॉ.योगेश अप्पाराव पवार पुणे .डॉ .सृष्टी सिद्धेश्वर पाटील. महेश दामोदर पवार .पवन सोमनाथ भोसले .विशाल राजेश पवार .अरविंद दिलीप पाटील या गावातील रत्नांनी विविध क्षेत्रात प्राविण्य मिळवलेले असून त्यांचा या उत्तुंग यशाबद्दल ग्रामस्थांच्या वतीने शुभेच्छा पर सन्मान आयोजित करण्यात आला होता.

यावेळी सदाशिव पवार विष्णू गवळी बंडू पवार यांनी शुभेच्छा पर विचार व्यक्त केले.कार्यक्रमास पोलीस पाटील नंदिनी गवळी .विठ्ठल सहकारी साखर कारखान्याचे संचालक कालिदास साळुंखे. विठ्ठल क्रेडिट सोसायटीचे माजी संचालक हनुमंत पवार .मराठा महासंघाचे सोलापूर शहर अध्यक्ष सदाशिव पवार .वसंतराव काळे सहकारी साखर कारखान्याचे कामगार प्रतिनिधी संचालक बंडू पवार .माजी सरपंच विष्णू गवळी .माजी उपसरपंच सुरेश नाना पवार .सिद्धेश्वर पाटील. पांडुरंग पवार .खेड भोसे विविध कार्य सोसायटीचे चेअरमन धनाजी साळुंखे .माजी व्हाईस चेअरमन विकास पवार. पशुवैद्यकीय डॉ.तानाजी पवार .संचालक बाळासाहेब पवार .प्रकाश साळुंखे नितीन पाटील बब्रुवान साळुंखे  .आप्पाराव पवार .सिद्धेश्वर पवार .भारत साळुंखे .विजय पवार .नवनाथ पवार .गणेश जमदाडे इत्यादी उपस्थित होते.