सोलापूर लोकसभेसाठी आ.प्रणिती शिंदेना मतदार संघात पसंती, जोरदार चर्चा सुरू;

सोलापूर लोकसभेसाठी आ.प्रणिती शिंदेना मतदार संघात पसंती, जोरदार चर्चा सुरू;

---------------------------------------------------------------------------------

सोलापूर (पंढरी नगरी न्यूज ) राज्यात काहीच महिन्यांच्या अंतरावर आगामी लोकसभा निवडणूक येऊन ठेपली आहे. त्यामुळे राजकीय पक्षांकडून काही विद्यमान आणि माजी आमदार हे भावी खासदारकीच्या रेसमध्ये येत आहेत. त्यामुळे अनेक जिल्ह्यात विविध नावे समोर येत आहेत. तर त्यांचे तसे भावी खासदार-भावी आमदार म्हणून बॅनर लागत आहेत. सोलापूरमध्ये देखील आता असाच एक बॅनर चर्चेचा विषय बनला आहे.

आमदार प्रणिती शिंदे यांची काँग्रेसच्या राष्ट्रीय कमिटीवर विशेष निमंत्रित सदस्य म्हणून निवड झाल्याबद्दल सोलापूर शहरात मोठ्या प्रमाणात बँनर लावले आहेत त्या बॅनरवर आमदार प्रणिती शिंदे यांचे ‘भावी खासदार’ म्हणून उल्लेख आहे.

मागील काही दिवसापासून सोलापूर लोकसभा निवडणूक काँग्रेसकडून कोण लढणार याविषयी चर्चा सुरु होती. त्यातच राष्ट्रवादी (शरद पवार) गटाने देखील सोलापूर लोकसभा जागेवर आपला दावा सांगितलं होता. त्यानंतर आमदार प्रणिती शिंदे यांना लोकसभा निवडणुकीसाठी पुढे केले जातं असल्याचे दिसतेय. तत्कालीन केंद्रीय गृहमंत्री सुशील कुमार शिंदे हे सत्ता स्थानी असताना आमदार प्रणिती शिंदे यांनी सोलापूर मंगळवेढा पंढरपूर लोकसभेचा मतदार संघ प्रचारादरम्यान पिंजून काढला होता त्यामुळे त्यांचा विशेषता पंढरपूर व मंगळवेढा या तालुक्यातील कार्यकर्त्यांचा संपर्कही मोठ्या प्रमाणात आला होता .त्यामुळे आमदार प्रणिती शिंदे यांना मानणारे कार्यकर्त्यांचे जाळे मोठ्या प्रमाणात असल्याचे सांगण्यात येते. तरी येणाऱ्या लोकसभेसाठी उमेदवारी मिळाली तर त्या सहजपणे निवडून येतील असा ठाम विश्वास पंढरपूर - मंगळवेढा मतदारसंघातील निष्ठावंत कार्यकर्त्यांमध्ये  असल्याची चर्चा होत असून त्यांना हमखास निवडून आणण्यासाठी दिवस-रात्र परिश्रम घेणार असल्याची माहिती कार्यकर्ते मधून होत आहे.