मंगळवेढ्याचे प्रांत अधिकारी यांच्यावरील कारवाईच्या मागणीसाठी शिवसेनेच्या वतीने राष्ट्रीय महामार्गावर तब्बल दोन तास आंदोलन

--------------------------------------------------------------------------------------
मंगळवेढा( प्रतिनिधी) : मंगळवेढ्याचे प्रांत अधिकारी आप्पासाहेब  समिंदर यांच्या भ्रष्टाचाराची चौकशी करून त्यांच्यावर फौजदारी कारवाई करण्यात यावी. या मागणीसाठी बाळासाहेबांची शिवसेना गटाच्या वतीने मंगळवेढा सोलापूर राष्ट्रीय महामार्गावर तब्बल दोन तास रस्ता रोको आंदोलन करण्यात आले.

दरम्यान आंदोलनकांनी निवेदन स्वीकारण्यास वरिष्ठ महसूल अधिकारी आल्याशिवाय आम्ही उठणार नाही अशी ताठर भूमिका घेतली काही काळ देतील वातावरण गंभीर असल्याचे चित्र दिसून आले मंगळवेढ्याचे उपविभागीय अधिकारी पारधी समाजांना जातीचे दाखले देणे कामे आडवणूक करतात तसेच तलाठी एजंट ही साखळी पद्धतीने भ्रष्टाचार करीत असून देखील त्यांची विभागीय पातळीवर चौकशी होऊन त्यांच्यावर फौजदारी गुन्हे दाखल करावेत .

तसेच काही बाधित शेतकऱ्यांना तात्काळ नुकसान भरपाई देण्यात यावी.नवीन संपादित जमिनीच्या शेतकऱ्यांना तात्काळ नोटीसा देण्यात याव्यात. इ. मागण्यासाठी दुपारी बारा वाजता मंगळवेढा सोलापूर राष्ट्रीय महामार्गावर टोल नाकाच्या पुढे रस्ता रोको करण्यात आला जवळपास वाहतुकीसाठी दोन तास रस्ता बंद राहिल्याने दोन्ही बाजूला रामलक्षक वाहनांच्या रांगा लागल्या होत्या आंदोलन करते सिमेंट रस्त्यावर ठिय्या धरून बसले होते .

आंदोलन आंदोलन कार्यकर्त्यांनी महसूल चे सोलापूर येथील वरिष्ठ अधिकारी निवेदन स्वीकारण्यास आल्याशिवाय आम्ही उठणार नाही. अशी ताठर भूमिका घेतल्याने हे आंदोलन लांबच जात असल्याने उभ्या असलेल्या वाहन चालकांनी एकाच वेळी हॉर्न वाजवून घोंगाट चालू केल्याने परिस्थिती गंभीर बनत जात असल्याचे पाहून उपस्थित पोलिसांनी सर्वांना शांत केले .सुरुवातीला निवेदन स्वीकारण्यात शहर शहरची तलाठी आले होते. मात्र आंदोलकांनी प्रांत अधिकारी वर तुम्ही कारवाई करणार का असा सवाल करून निवेदन देण्यास साफ नकार दिला. परिस्थितीची चिगळत जात असल्याचे पाहून मंडलाधिकारी साळुंखे यांनी निवेदन स्वीकारले.

यावेळी शिवसेना उपजिल्हाध्यक्ष संजय गेजगे .डी के साखरे. समाधान हेंबाडे. शिवाजी जावीर .सिद्धराया माळी .येताळा खरबडे. पंकज ताटे.अशोक रणदिवे रमेश शिंदे .दीपक ऐवळे .रोहित एकमली यांच्यासह विविध पक्ष संघटनाचे कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.