श्री विठ्ठल - रुक्मिणी मातेच्या चरणी सोन्याची तुळशी माळ अर्पण,

श्री विठ्ठल - रुक्मिणी मातेच्या चरणी सोन्याची तुळशी माळ अर्पण,

------------------------------------------------------------------------------------

पंढरपूर( दै.पंढरी नगरी न्यूज ): श्री विठ्ठल- रुक्मिणी मंदिरे समितीस श्रीमती अलका अंकुश घाडगे रा. आनंदनगर टाकळी रोड, पंढरपूर यांनी श्रींच्या चरणी सुमारे 5 लक्ष किमतीची सोन्याची तुळशी माळ अर्पण केल्याची माहिती व्यवस्थापक मनोज श्रोत्री यांनी दिली.

त्याबद्दल देणगीदार यांचा सत्कार मंदिर समितीच्या वतीने मंदिर समितीचे व्यवस्थापक मनोज श्रोत्री यांच्या हस्ते श्रींची प्रतिमा व उपरणे देऊन करण्यात आला. यावेळी देणगीदार यांचे कुटुंब उपस्थित होते.

या सोन्याच्या तुळशी माळेला 43 पाने व 88 व्हर्टिकल मनी आहेत. त्याचे अंदाजे वजन 60.78 ग्रॅम असून, 5 लक्ष 14 हजार इतकी किंमत होत आहे. देणगीदार हे पंढरपूर येथील रहिवासी असून श्री विठ्ठल - रुक्मिणी मातेचे निस्सिम भक्त आहेत.

सोने चांदी देणगी स्वीकारण्यासाठी स्वतंत्र विभाग आहे. त्यासाठी अनुभवी व तज्ञ सराफाची नियुक्ती करण्यात आली आहे. सोने-चांदी देणगी देणाऱ्या भाविकांना संगणकीय प्रणाली द्वारे पावती देण्यात येते. इच्छुक भाविकांनी मंदिर समितीच्या कार्यालयात संपर्क करावा असे आवाहन मंदिर समितीच्या वतीने यावेळी श्रोत्री यांनी केले.