अक्षयतृतीया निमित्त श्री रूक्मिणी मातेस अलंकार परिधान, आजपासून श्रींच्या महानैवेद्यामध्ये आमरसाचा समावेश,
------------------------------------------------------------------------------------
पंढरपूर ( दै.पंढरी नगरी न्यूज ):- हिंदू वर्षातील महत्वाचे साडेतीन मुहुर्तापैकी अक्षय तृतीया एक मुहूर्त आहे. हिंदू धर्मात या सणाला विशेष महत्त्व असतं. त्यानिमित्ताने श्री रूक्मिणी मातेस अलंकार परिधान करण्यात आल्याची माहिती व्यवस्थापक मनोज श्रोत्री यांनी दिली.
यामध्ये श्री रूक्मिणी मातेस सोने मुकुट, वाक्या जोड, तोडे जोड, तानवड जोड, चिंचपेटी तांबडी, जवमणी पदक, जवेच्या माळा, मोहरांची माळ, पुतळ्यांची माळ, हायकोल, लक्ष्मीहार सरी, कंबरपट्टा इत्यादी अलंकारांचा समावेश आहे.
तसेच परंपरेनुसार अक्षय तृतीया पासून वटपोर्णिमे पर्यंत श्रींच्या महानैवेद्यामध्ये शेवयाची खीर ऐवजी आमरसाचा समावेश करण्यात येत आहे. याशिवाय, श्री संत तुकाराम भवन येथील अन्नछत्राच्या दुपारच्या भोजनप्रसादामध्ये देखील आमरसाचा समावेश करण्यात आला होता. त्याचा सुमारे 2000 ते 2500 भाविकांनी लाभ घेतला. तसेच आनंद (गुजरात) येथील विठ्ठल भक्ताने श्री रुक्मिणी मातेस पाच ग्रॅम वजनाचे मंगळसूत्र अर्पण केल्याचे श्रोत्री यांनी सांगितले.