श्री विठ्ठल - रुक्मिणी मातेच्या चरणी सोन्याचा तुळशीहार अर्पण.
------------------------------------------------------------------------------------
पंढरपूर( दै.पंढरी नगरी न्यूज ): श्री विठ्ठल- रुक्मिणी मंदिरे समितीस 5.25 लाख किंमतीचा व 61.48 ग्रॅम वजनाचा सोने पदकासह तुळशी हार, नागपूर येथील भाविक आशा नवघरे यांनी अर्पण केल्याची माहिती श्री विठ्ठल - रुक्मिणी मंदिर समितीचे व्यवस्थापक मनोज श्रोत्री यांनी दिली.

त्याबद्दल देणगीदार यांचा मंदिर समितीच्या वतीने मंदिर समितीचे व्यवस्थापक मनोज श्रोत्री यांच्या हस्ते श्रींची प्रतिमा व उपरणे देऊन सन्मान केला. यावेळी देणगीदार यांचे कुटुंब व विभाग प्रमुख राजेंद्र सुभेदार उपस्थित होते.