सद्गगुरु विठोबा महाराज चातुर्मासे गुरुभक्त परिवार, पंढरपूर यांच्याकडून श्री विठ्ठल चरणी सुवर्ण तुळस हार अर्पण

------------------------------------------------------------------------------------
पंढरपूर (दै.पंढरी नगरी न्यूज) आज श्री विठ्ठल-रुक्मिणी मंदिरे समिती, श्री क्षेत्र पंढरपूर येथे सद्गगुरु विठोबा महाराज चातुर्मासे गुरुभक्त परिवार, पंढरपूर यांच्या वतीने श्री विठ्ठल चरणी सुवर्ण तुळस हार (१०८ पाने) अर्पण करण्यात आला.
सदर सुवर्ण तुळस हाराचे एकूण वजन ११.१७० मिली ग्रॅम असून त्याची किंमत रु. १,२२,०००/- इतकी आहे. या दानाचे औचित्य साधून गुरुभक्त परिवाराच्या वतीने मंदिर समितीला हार समर्पित करण्यात आला.
या प्रसंगी समिती सदस्य जळगावकर महाराज यांच्या हस्ते हार स्वीकारण्यात आला तसेच गुरुभक्त परिवाराचा सत्कार करण्यात आला.