विठ्ठल चे, चेअरमन अभिजीत पाटील यांच्या गडावर हुरडा पार्टीचे आयोजन
------------------------------------------------------------------------------------
पंढरपूर(दै. पंढरी नगरी न्यूज) : श्री विठ्ठल सहकारी साखर कारखान्याचे चेअरमन अभिजीत पाटील यांनी चेअरमन पदाची सूत्रे आधी घेतल्यानंतर श्री विठ्ठल सहकारी साखर कारखान्याची विस्कटलेली घडी चांगल्या पद्धतीने बसवून साखर कारखाना चांगल्या पद्धतीने उसाचे गाळप करून चालवत आहेत ऊस उत्पादक सभासद व वाहन मालकाचे थकीत रक्कम निवडणुकीत दिलेल्या वचननाम्याप्रमाणे असणारी रक्कम दिली असल्याने शब्द पाळून ऊस उत्पादक सभासदांच्या विश्वासात पात्र ठरल्याने ऊस उत्पादक सभासदांमध्ये चेअरमन अभिजीत पाटील यांचे मोठ्या प्रमाणात कौतुक होत आहे.
त्याचप्रमाणे कारखान्याचे गाळपही चांगल्या पद्धतीने होत आहे ऊस उत्पादक सभासद शेतकऱ्यांनी आपला ऊस विठ्ठलाच देण्यात यावा त्यामुळे कारखाना व सभासद यांचा विकास होण्यास मदत होणार आहे याचाच एक भाग म्हणून गेले काही वर्ष बंद असलेली हुरडा पार्टी यंदा चेअरमन अभिजीत पाटील व संचालक मंडळ यांच्या सहकार्याने विठ्ठल सहकारी साखर कारखान्यावर विठ्ठल परिवारातील सर्व सामान्य शेतकरी सभासद कार्यकर्ते यांच्या समवेत जंगी हुरडा पार्टीचे आयोजन करण्यात आले .असल्याचे चेअरमन अभिजीत आबा पाटील यांनी सांगितले .
हुरडा पार्टी दि.११ ते १४ जानेवारी पर्यंत दुपारी ३ ते ६या कालावधीत होणार आहे .तरी विठ्ठल परिवारातील सर्वसामान्य कार्यकर्ते .ऊस उत्पादक सभासद .वाहन मालक यांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहण्याचे आवाहन चेअरमन अभिजीत पाटील यांनी केले आहे .