वाळू माफियांचा भीमा नदीवर घाला; दिवसा ढवळ्या सर्रासपणे वाळू उपसा सुरूच, प्रशासन मात्र ढिम्म
---------------------------------------------------------------------------------
पंढरपूर (पंढरी नगरी न्यूज) : काही दिवसांपुर्वीच राज्यातील शिंदे - फडणवीस सरकारने रेती माफिया बेकायदा उत्खननाला आता चाप लगावण्याचा निर्णय घेतला होता.त्याप्रमाणे महाराष्ट्र रेती/वाळू धोरण लागू केलं जाणार आहे. मात्र सोलापूरचे पालकमंत्री असलेले महसूल मंत्री राधाकृष्ण विखे पाटील त्याच्या पंढरपुर तालुक्यात वेगळेच चित्र समोर येत आहे. येथे भीमा नदी पात्रातील वाळू ची यारीच्या साह्याने राजरोसपणे वाळू माफिया काढत आहेत. तो ही कोणतेही लिलाव झाला नसताना.
त्यामुळे भीमा नदी पात्रात पाण्या ऐवजी खड्ड्यांचे साम्राज्य दिसत आहे. तर दररोज हजारो ब्रास वाळू ही मुंढेवाडी, पुळूज, पोहरगांव, खरसोळी, आंबे, सरकोली, शिरढोण, सह इतर ठीकणावरून चोरून नेल्या जात आहे. स्थापन करण्यात आलेली दक्षता पथक नावालाच स्थापन केले असून गायब आहेत मात्र यावर कारवाई करण्याची ज्या महसूल विभागाची जबाबदारी आहे. ते झोपेचे सोंग घेताना दिसतेय. महत्वाचे म्हणजे पंढरपूर शहराजवळ अवैध वाळू उपशामुळे एका युवकाचा नदी पात्रात बुडून मृत्यू झाला होता.