पंढरपूर येथे कर्मवीर औदुंबर (अण्णा) पाटील यांची जयंती उत्साहाने साजरी...

पंढरपूर येथे कर्मवीर औदुंबर (अण्णा) पाटील यांची जयंती उत्साहाने साजरी...

------------------------------------------------------------------------------------
कल्याणराव काळे यांनी केले आण्णांच्या प्रतिमेस अभिवादन
------------------------------------------------------------------------------------

पंढरपूर( दै. पंढरी नगरी न्यूज ) : पंढरपूर तालुक्याचे भाग्यविधाते, औद्योगिक क्रांतीचे जनक ,व महाराष्ट्र राज्य साखर संघाचे अध्यक्ष, माजी आमदार ,गुरसाळे येथील श्री विठ्ठल सहकारी साखर कारखान्याचे संस्थापक ,चेअरमन  कर्मवीर औदुंबर (अण्णा) कोंडीबा पाटील यांच्या ९९वी  जयंती पंढरपूर येथील विठ्ठल हॉस्पिटलमध्ये विठ्ठल परिवाराचे तथा सोलापूर राष्ट्रवादीचे नेते वसंतराव काळे सहकारी साखर कारखान्याचे चेअरमन कल्याणराव काळे यांच्या हस्ते कर्मवीर औदुंबर (अण्णा) पाटील यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून विनम्र अभिवादन करण्यात आले.

यावेळी श्री विठ्ठल हॉस्पिटल  ट्रस्टचे अध्यक्ष युवराज पाटील. विठ्ठल सहकारी साखर कारखान्याचे माजी संचालक विलासराव साळुंखे सर. विठ्ठलचे माजी संचालक महादेव देठे .यशवंतराव चव्हाण नागरी सहकारी पतसंस्थेचे चेअरमन शहाजी साळुंखे .संचालक शंकर कवडे रोपळे येथील ज्येष्ठ सभासद नागनाथ गायकवाड. सुधीर भोसले इत्यादी सभासद नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.