श्री संत दामाजी साखर कारखान्याचा सोमवारी ३० वा. गळीत हंगाम शुभारंभ..

श्री संत दामाजी साखर कारखान्याचा सोमवारी ३० वा. गळीत हंगाम शुभारंभ..

-----------------------------------------------------------------------------------

मंगळवेढा (प्रतिनिधी) : श्री संत दामाजी सहकारी साखर कारखान्याचा हंगाम २०२२-२३ च्या ३० वा. गळीत हंगामाचा शुभारंभ सोम. दि. १७/१०/२०२२ रोजी सकाळी ११-३० वा. असल्याची माहिती कारखान्याचे व्हाईस चेअरमन तानाजी खरात यांनी दिली.

गळीत हंगामाचा शुभारंभ पंढरपूरचे वासकर फडाचे फड प्रमुख ह. भ .प गोपाळ तुकाराम वासकर महाराज तसेच ज्येष्ठ सभासद शेतकरी रमेश किसनलाल मर्दा .मनोहर कलुबमे .जगन्नाथ कोकरे दादा बंडगर भीमराव मोरे .कृष्णा मासाळ .यांच्या शुभहस्ते होणार असून कारखान्याची माजी चेअरमन व धनश्री परिवाराचे प्रमुख शिवाजीराव काळुंगे सर हे अध्यक्षस्थानी असणार आहेत. तसेच या कार्यक्रमासाठी कारखान्याची माजी चेअरमन तालुका काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष नंदकुमार पवार. रतनचंद शहा बँकेचे चेअरमन राहुल शहा .बळीराजा पतसंस्थेचे चेअरमन दामोदर देशमुख. जिजामाता पतसंस्थेचे मार्गदर्शक रामकृष्ण नागणे .दामाजी कारखान्याची माजी व्हाईस चेअरमन रामचंद्र वाकडे. माजी संचालक यदाप्पा माळी यांच्या प्रमुख उपस्थितीत हा गळीत हंगाम होणार आहे .

यावेळी कारखान्याचे संचालक गोपाळ  भगरे व त्यांच्या सुविध पत्नी  रीना भगरे यांच्या उभयतांच्या हस्ते श्री सत्यनारायण महापूजा चे आयोजन करण्यात आली आहे. गळीत हंगामाची पूर्ण तयारी झाली असून कार्यक्षेत्रामध्ये ८ ते ९ लाख मेट्रिक टन ऊस उपलब्ध असून संचालक मंडळाने या गळीत हंगामासाठी ६ लाख मेट्रिक टन गाळपाचे उद्दिष्ट ठेवले आहे .यासाठी आवश्यक असणारी ऊस तोडणी वाहतूक यंत्रणा कारखान्यावर सज्ज आहे .मशिनरीच्या सर्व चाचण्या घेण्यात आले आहेत. सभासद शेतकरी यांचे सहकारी व अधिकारी कर्मचारी यांच्या योगदानामुळे गळीत हंगामामध्ये गाळपाचे उद्दिष्ट पार पडणार आहे .

तरी सर्व सभासद  शेतकरी यांनी आपला ऊस संत दामाजी कारखान्यास गळीतास देऊन कारखान्याची प्रगतीसाठी सहकार्य करावे व गळीत हंगाम शुभारंभ कार्यक्रम तालुक्यातील सभासद शेतकरी वाहन मालक यांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहावे असे आवाहन व्हाईस चेअरमन तानाजी खरात यांनी केले.