शिक्षक पतसंस्था निवडणुकीत सत्ताधारी गुरुसेवा परिवाराची सत्ता कायम
-------------------------------------------------------------------------------------
विरोधी गटाच्या समितीचा टांगा पलटी
-------------------------------------------------------------------------------------
सोलापूर प्रतिनिधी: जिल्हा प्राथमिक शिक्षक सहकारी पतसंस्थेची निवडणुकीत गुरुसेवा परिवाराने एक हाती सत्ता अबाधित राखली असून ७०० मताच्या फरकाने या पॅनलला पतसंस्थेच्या सभासदांनी मतदार रुपी मतदान करून मोठ्या फरकाने निवडून दिले. या निवडणुकीत विरोधी समिती गटाच्या उमेदवारांना दारून पराभव केला .सर्वसामान्य मतदार संघात ७०२९ मतदारांनी मतदानाचा हक्क बजावला होता त्यापैकी ६८२० मतपत्रिका वैद्य ठरल्या .२०९ मतपत्रिका बाद झाल्या .
आहेत .गुरु सेवा पॅनल मधून निवडून आलेले विजयी उमेदवार खालील प्रमाणे -विठ्ठल काळे .मच्छिंद्रनाथ मोरे संजय खेडेकर .आबासाहेब जाधववर .गुलाबराव पाटील .वीरभद्र यादवाड. तानाजी गुंड .शिवाजी पाटील. राजेंद्र आवारे. शेखर कोरके. रमेश घंटेनवरू .हनुमान सरडे. रामचंद्र यादव .रमेश शिंदे. महिला प्रतिनिधी- शितल चव्हाण. राणी होनमाने. अनुसूती अनुसूचित- जाती -जमाती सत्यवान जैनजागडे. इतर मागासवर्गी मतदार संघ -संभाजी फुले .भटक्या विमुक्त प्रवर्ग- रवींद्र पाटील. यावेळी निवडणूक निर्णय अधिकारी म्हणून डी एस भवर यांनी काम पाहिले. गुरु सेवा शिक्षक परिवाराच्या संपूर्ण पॅनल विजय घोषित झाल्याचे कळताच शिक्षक मतदार बंधूंनी दिवाळी सणाच्या अगोदरच फटाके फोडून दिवाळी साजरी करण्यात आली.