डॉ. एस आर रंगनाथन यांची जयंती बार्शीच्या कर्मवीर सार्वजनिक ग्रंथालयामध्ये उत्साहाने साजरी.
---------------------------------------------------------------------------
बार्शी (दै.पंढरी नगरी न्यूज): येथील कर्मवीर सार्वजनिक ग्रंथालयामध्ये भारताचे पहिले ग्रंथपाल,ग्रंथालय शास्त्राचे जनक,भारतात सार्वजनिक ग्रंथालयाचे मुहूर्तमेढ रोवणारे,द्विबिंदू वर्गीकरण पध्दतीचे शोध लावणारे संशोधक पद्मश्री डाॅ.एस.आर.रंगनाथन् यांच्या १३४ वी जयंती राष्ट्रीय ग्रंथपाल दिन म्हणून साजरी करण्यात आली.
प्रथमतः प्रमुख मान्यवरांचे शुभहस्ते पद्मश्री डॉ.एस्.आर.रंगनाथन् यांच्या प्रतिमेचे पुष्पहार घालून पूजन करण्यात आले.यावेळी सेवानिवृत्त अधिकारी मा.भागवत बोबडे,सामाजिक कार्यकर्ते मा.नईमभाई शेख मंत्री,मा.शाम जानराव,प्रेम अग्रवाल यांचेसह सभासद,वाचक आदी उपस्थित होते.या औचित्याने ग्रंथपाल गायकवाड यांचा उपस्थितीतांचे वतीने पुष्पगुच्छ देवून सन्मान करण्यात आला.ग्रंथपाल विनोद गायकवाड यांनी कार्यक्रमाचे प्रास्ताविक व सूत्रसंचालन केले.