मारापूरचे जागृत ग्रामदैवत खंडोबा यात्रेस उत्साहात सुरुवात चमकदार विद्युत रोषणाईने झळकले मंदिर
-----------------------------------------------------------------------------------
मंगळवेढा( पंढरी नगरी न्यूज ) मारापूर (ता.मंगळवेढा) येथील ग्रामस्थांचे जागृत ग्रामदैवत श्री .खंडोबा देवस्थान नवरात्र महोत्सव मंडळ यांच्या वतीने विविध धार्मिक कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे.
रविवार दि. १० डिसेंबर रोजी सायंकाळी ७ वाजता धनगरी ओव्यांचा कार्यक्रम तर मोहन यादव यांच्या वतीने महाप्रसादाच्या आयोजन करण्यात आले होते.
सोमवार दि. ११ डिसेंबर रोजी सायंकाळी ८ वाजता जय हनुमान भजनी मंडळ मारापुर यांच्या भजनाचा कार्यक्रम तर संतोष व धनाजी यादव यांच्या वतीने महाप्रसादाचे आयोजन केले आहे.
मंगळवार दि. १२ डिसेंबर रोजी सायंकाळी ७ वाजता खुल्या डान्स स्पर्धा तर प्रभाकर यादव यांच्या वतीने महाप्रसादाचे आयोजन करण्यात आले आहे.
बुधवार दि.१३ डिसेंबर रोजी रात्री ८ वाजता जादूगार शालीमार कोल्हापूर यांच्या जादूचा भरघोस कार्यक्रम तर प्रभाकर इंगोले यांच्या वतीने महाप्रसादाचे आयोजन केले आहे.
गुरुवार दि. १४ डिसेंबर रोजी रात्री ८ वाजता जय मल्हार वाघ्या मुरळी तावशी यांचा कार्यक्रम तर सुभाष यादव यांच्या वतीने महाप्रसादाच्या आयोजन केले आहे.
शुक्रवार दि. १५ डिसेंबर रोजी रात्री ८ वाजता भारुडाची जुगलबंदी कार्यक्रम तर ज्ञानोबा चौधरी यांच्या वतीने महाप्रसादाचे आयोजन केले आहे.
शनिवार दि. १६ डिसेंबर रोजी सकाळी १० वाजता भेदिक गाण्याचा कार्यक्रम तर कुबेर जानकर यांच्या वतीने महाप्रसादाचे आयोजन केले आहे.
रविवार . १७ डिसेंबर रोजी अण्णासाहेब पाटील यांच्या वतीने महाप्रसाद त्याचबरोबर सायंकाळी ७ वाजता खंडोबा देवाचा छबीना सुरू होणार आहे व रात्री ९ वाजता सारेगम आर्केस्ट्रा पार्टी कोल्हापूर यांच्या कार्यक्रमाचे आयोजन केले आहे.
सोमवार दि.१८ डिसेंबर रोजी सकाळी नैवेद्य तसेच ११ ते २ या वेळेत मुलांची रांगोळी स्पर्धा तर दुपारी ३ वाजता जंगी कुस्ती मैदानाचे आयोजन केले आहे.
खंडोबा मंदिरास विद्युत रोषणाई काम सुभाष यादव यांच्यातर्फे तर शोभेचे औषध अरुण आसबे यांनी त्याचबरोबर छबीन्यास भंडाऱ्याचे उधळण संजय यादव यांच्या वतीने करण्यात येणार आहे. खंडोबा मंदिरामध्ये हे सर्व कार्यक्रम होणार असून श्री .खंडोबा देवस्थान यात्रा कमिटीचे सर्व पदाधिकारी,सदस्य यासाठी परिश्रम घेत आहेत.