कुर्डुवाडी शहरात मेफेड्रोन ड्रग विक्रीसाठी घेवून येणारा आरोपी पोलिसांच्या जाळ्यात. ◼️63 ग्रॅम MD व चारचाकी वाहन, मोबाईलसह एकुण 9,89,000/- रुपये किमतीचा मुद्देमाल हस्तगत. ◼️पोलीस निरीक्षक अतुल माहिती यांची दमदार कामगिरी.

कुर्डुवाडी शहरात मेफेड्रोन ड्रग  विक्रीसाठी घेवून येणारा आरोपी  पोलिसांच्या जाळ्यात.  ◼️63 ग्रॅम MD व चारचाकी वाहन, मोबाईलसह  एकुण 9,89,000/- रुपये किमतीचा मुद्देमाल हस्तगत.  ◼️पोलीस निरीक्षक अतुल माहिती यांची दमदार कामगिरी.


--------------------------------------------------------------------------
 कुर्डूवाडी,( दै.पंढरी नगरी न्यूज) :-अंमली पदार्थ व त्याचे पासून तयार झालेले इतर नशेचे पदार्थ यांच्यावर कडक कारवाई करण्याबाबत शासनासाकडून विविध प्रकारचे प्रयत्न करण्यात येत असून सोलापूर ग्रामीण पोलीस दलाकडून देखील अंमली पदार्थ विषयी जनजागृती व कारवाई अशी दुहेरी काम करण्यात येत आहे. यामध्ये दि. 18 रोजी अतुल कुलकर्णी पोलीस अधीक्षक सोलापूर ग्रामीण यांनी जिल्हयातील महत्वाचे विभागाची (N-Cord‍ समिती‍ )  बैठक घेवून अंमली पदार्थाबाबत कडक कारवाई करण्याबाबत सुचना दिले आहेत. 
        सदर बैठक झाल्यानंतर स्थानीक गुन्हे शाखेचे पोलीस  निरीक्षक  संजय जगताप यांनी  जिल्हयातील अंमली पदार्थविषयक गुन्हे करणारे इसमांवर लक्ष केंद्रीत करून त्याच्या हालचालीवर लक्ष ठेवले होते त्यामध्ये गोपनीय बातमीदार यांचेकडून कुर्डुवाडी पोलीस ठाणे हद्दीत मेफेड्रोन ड्रग (MD) अंमली पदार्थाची विक्री होत असले बाबत गोपनीय माहिती संजय जगताप, पोलीस निरीक्षक यांना प्राप्त झाली होती. या बातमीवरून पोनि संजय जगताप यांनी कुर्डुवाडी पोलीस ठाणेच्या हद्दीत करमाळा रोडवरुन कुर्डुवाडी शहराकडे इसम नामे सोहेल अमर मुलाणी रा. कुर्डूवाडी हा त्याचेकडील चारचाकी वाहन वरुन मेफेड्रोन ड्रग (MD) अंमली पदार्थ विक्रीसाठी सोबत घेवून येत आहे. सदर इसमावर कायदेशीर कारवाई करण्याबाबत अतुल मोहीते पोलीस निरीक्षक,  कुर्डुवाडी पोलीस ठाणे यांना सांगुन, सपोनि भीमगोंडा पाटील नेमणुक स्थानिक गुन्हे शाखा यांना मदत करणेबाबत आदेश दिले. 
        त्याप्रमाणे अतुल मोहीते पोलीस निरीक्षक, कुर्डुवाडी पोलीस ठाणे व सपोनि  पाटील हे पथकासह करमाळा रोडवरुन कुर्डुवाडी शहराकडे येणारे रस्तावरील बौद्ध विहारजवळ पोलीस पथक व पंचासह सापळा लावुन थांबले. थोडयाच वेळात बातमीप्रमाणे करमाळा रोडवरुन कुर्डुवाडी च्या दिशेने एक संशयित एक इसम आपल्या ताब्यात चारचाकी वाहन घेवुन येत असल्याचे दिसून आले. सदर इसम थांबलेल्या ठिकाणी जवळ येताच पोनि मोहिते यांनी सापळा पथकातील पोलीस अंमलदार यांना इशारा करुन सतर्क राहण्याच्या सुचना दिल्या. सदर इसम जवळ येताच पोनि/मोहिते यांना बातमीतील हेच इसम असल्याची खात्री झाल्यानंतर त्यांनी केलेल्या इशा-यावरुन सापळा पथकातील अधीकारी व अंमलदार यांनी त्यास इसमास जागीच पकडले. त्यांनतर सदर इसमास त्याचे नाव व पत्ता विचारता त्याने त्याचे नांव सोहेल अमर मुलाणी, वय 28 वर्षे, रा. खाटीक गल्ली, कुर्डूवाडी, ता. माढा, जि. सोलापूर असे असल्याचे सांगितले. पोलीस पथकाने सोहेल अमर मुलाणी याची अंगझडती घेतली असता, त्याचे ताब्यात 63 ग्रॅम मेफेड्रोन (MD) हा 1,89,000/- रु. किमतीचा अमली पदार्थ व गुन्हा करण्यासाठी वापरलेली होंडा कंपनीची BR -V ही चारचाकी वाहन व मोबाईल असे किंमत रूपये 8,00,000/- असा एकूण 9,89,000/- रूपये किमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. 
        सदर प्रकरणी इसम नामे सोहेल अमर मुलाणी वय 28 वर्शे रा.खाटीक गल्ली कुर्डूवाडी ता.माढा जि.सोलापूर याच्य विरुद्ध कुर्डुवाडी पोलीस ठाणे गु.र.नबर 426/ एन.डी.पी.एस अॅक्ट 1985 कलम 8 क, 22 क अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. त्यास मा. न्यायालय समक्ष हजर केले असता त्याची दि. 24 रोजी पर्यंत पोलीस कोठडी रिमांड मंजूर करण्यात आलेली आहे. गुन्हाचा पुढील तपास सपोनि गटकुळ कुर्डुवाडी पोलीस ठाणे हे करीत आहेत. 
       सदरची कामगिरी  अतुल कुलकर्णी, पोलीस अधीक्षक,   विजय कबाडे, अपर पोलीस अधीक्षक, मा. श्रीमती. मा. प्रेरणा कट्टे, अपर पोलीस अधीक्षक,  श्रीमती अंजना कृश्णा व्हि.एस मॅडम. सह.पोलीस अधिक्षक करमाळा उपविभाग, पोलीस निरीक्षक, संजय जगताप स्था.गु.शाखा, पोलीस निरीक्षक  अतुल मोहिते नेम. कुर्डुवाडी पोलीस ठाणे यांचे मार्गदर्शनाखाली सपोनि भिमगोंडा पाटील, सपोनि गटकुळ, पोलीस हवालदार  सलीम बागवान, अजय भोसले, विजय भरले, पोकॉ सागर ढोरे-पाटील, प्रमोद शिंपाळे, किरण चव्हाण, अनवर अत्तार, चापोकॉ दिलीप थोरात तसेच कुर्डुवाडी पोलीस ठाणे कडील पोलीस हवालदार सुशांत शींदे, संतोष मोरे, मपोहेकॉ फुलन कस्तुरे, पोकॉसमीर पठाण, चापोकॉ दत्तात्रय शींदे, यांनी पार पाडली आहे.