सोलापूरसह सर्व महानगरपालिकांची नव्याने होणार प्रभाग रचना ; आदेश पारीत..

सोलापूरसह सर्व महानगरपालिकांची नव्याने होणार प्रभाग रचना ; आदेश पारीत..

---------------------------------------------------------------------------------

मुंबई (दै.पंढरी नगरी न्यूज) : महाराष्ट्र शासनाच्या नगरविकास विभागाने आज रोजी एक आदेश काढत सोलापूर सह इतर महानगरपालिकांच्या आयुक्तांना सूचना केल्या आहेत की, महानगरपालिका सार्वत्रिक निवडणुकीसाठी प्रभाग रचना तयार करायची आहे, यासाठी सन २०२२च्या महाराष्ट्र अधिनियम क्रमांक २१तसेच २०२२ चा महाराष्ट्र अधिनियम क्रमांक ४३ नुसार आदेश काढण्यात आले आहेत.

आदेशात म्हटले आहे की, मुंबई महानगरपालिका अधिनियम१९८८ व महाराष्ट्र महानगरपालिका अधिनियम १९४९ मध्ये संदर्भनीय अधिनियमानुसार सुधारित केलेल्या तरतुदीप्रमाणे मुदत संपलेल्या व नजीकच्या कालावधीत मुदत संपत असलेल्या सर्व महानगरपालिकांच्या आगामी सार्वत्रिक निवडणुकीसाठी लगतच्या जनगननेनुसार प्रभागांची संख्या व रचना निश्चित करून प्रभाग रचनेचे प्रारूप तयार करण्यासाठी आवश्यक ती कारवाई तात्काळ सुरू करण्यात यावी असे आदेश काढण्यात आले आहे.

यामुळे आता पुन्हा एकदा नव्याने प्रभाग रचना निश्चित करण्यात येणार आहे आणि त्यानंतरच सोलापूर महानगरपालिकेसह इतर महानगरपालिकेची सार्वत्रिक निवडणुक लागणार आहे. सदर आदेश निघाला असला तरी प्रभाग किती प्रतिनिधींचा असणार आहे हे मात्र स्पष्ट करण्यात आले नाही.