खासदार शरद पवार व केंद्रीय मंत्री नितिन गडकरी यांना डॉक्टररेट पदवी प्रदान!
___________________________________________________
औरंगाबाद : (दै.पंढरी नगरी न्यूज) : राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार व केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांना डॉक्टरेट ऑफ लिटरेचर ही पदवी देण्यात आली आहे. डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठ औरंगाबाद तर्फे ही पदवी देण्यात आली. या कार्यक्रमाला राज्यपाल भगतसिंह कोश्यारी हेही उपस्थित होते. देशामध्ये विद्यापीठ हे संशोधनाचे केंद्र म्हणून ओळखले जात आहे. याचे नाव जागतिक स्तरावर उंचावले आहे, असे शरद पवार यांनी म्हटले आहे.
डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाकडून राष्ट्रवादीचे नेते शरद पवार आणि मंत्री नितीन गडकरी यांना डी. लीट पदवी देण्यात आली. यावेळी शरद पवारांनी विद्यापीठाच्या नामांतर लढ्याबद्दलच्या आठवणींना उजाळा दिला, यावेळी पवार भावूक झाले. ‘ज्या विद्यापीठाच्या नामांतरासाठी सत्तेवर पाणी सोडावे लागले. त्याच विद्यापीठाने जवळजवळ ३२ वर्षानंतर डी. लिट देऊन गौरव केला,’ असेही ते यावेळी म्हणाले.
या सोहळ्यात शरद पवार काही क्षण स्तब्ध झाले होते. खासकरून जेव्हा त्यांच्या योगदानाचा आढावा घेतला जात होता, तेव्हा शरद पवार भावूक झालेले पाहायला मिळाले. डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाने राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार आणि डी. लिट पदवी देऊन गौरव केला. ज्यावेळी पवारांच्या नामविस्तार आंदोलनाचा डॉक्यूमेंट्रीतून आढावा घेतला जात होता. तेव्हा शरद पवार भावूक झालेले पाहायला मिळाले. त्यांच्या चेहऱ्यावरचे भावपूर्णपणे बदलून गेले होते.