मा.आ. प्रशांत परिचारक यांना साखर उद्योगाचा गौरव पुरस्कार जाहीर:

मा.आ. प्रशांत परिचारक यांना साखर उद्योगाचा गौरव पुरस्कार जाहीर:

पंढरपूर प्रतिनिधी :- श्रीपुर तालुका माळशिरस येथील पांडुरंग सहकारी साखर कारखान्याचे चेअरमन मा.आ.प्रशांत परिचारक यांना डेक्कन शुगर टेक्नॉलॉजी असोसिएशन या नामांकित उद्योग समूहाचा साखर उद्योग गौरव पुरस्कार नुकताच जाहीर झाला आहे. पुणे येथे दिनांक 18 सप्टेंबर रोजी देशाचे माजी कृषिमंत्री तथा राष्ट्रवादी काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष शरद पवार यांच्या हस्ते पुरस्काराचे वितरण होणार आहे .

पुणे येथील डेक्कन शुगर टेक्नॉलॉजी असोसिएशन ही देशभरातील नामांकित कंपनी आहे. यांच्यामार्फत 2021 या सालाकरिता पांडुरंग कारखान्याचे चेअरमन प्रशांत परिचारक यांनी साखर कारखानदारीत उल्लेखनीय कामगिरी केल्याबद्दल या नामांकित कंपनीने त्यांना साखर उद्योग गौरव पुरस्कार जाहीर केला आहे. या पुरस्काराचे वितरण दिनांक 18 सप्टेंबर 2022 रोजी पीएसआय पुणे येथे माझी कृषिमंत्री शरद पवार यांच्या हस्ते होणार आहे. प्रशांत परिचारक हे आपले चुलते कैलासवासी सुधाकर पंत परिचारक यांच्या पावलावर पाऊल ठेवून आपल्या ताब्यातील असणारी साखर कारखानदारीत योग्य नियोजन व काटकसर करून साखर कारखानदारी चांगल्या पद्धतीने चालवण्याची जबाबदारी पार पाडीत असून शेतकऱ्यांना त्यांच्या घामाचे दाम मिळण्यासाठी चांगला ऊस दर देत आहेत. 

त्यामुळे पांडुरंग परिवाराच्या साखर कारखान्याच्या चेअरमन प्रशांत परिचारक यांना साखर उद्योग गौरव पुरस्कार मिळाल्यामुळे माळशिरस तालुक्यांसह पंढरपूर तालुक्यातील कामगार व शेतकऱ्यांमध्ये उत्साहाचे व आनंदाचे वातावरण निर्माण झाले आहे. काल या पुरस्कार जाहीर झाल्याची माहिती मिळताच श्रीपुर येथील कारखाना स्थळावर व पंढरपूर तालुक्यातील कार्यकर्त्यांनी एकत्र येऊन फटाके फोडून आनंद साजरा केला.