पंढरपूर संतभूमी बचाव संघर्ष समितीच्या अध्यक्षपदी - आदित्य फत्तेपुरकर

पंढरपूर संतभूमी बचाव संघर्ष समितीच्या अध्यक्षपदी - आदित्य फत्तेपुरकर

---------------------------------------------------------------------------------
प्रस्तावित कॉरिडॉरला विरोध करण्यासाठी पंढरपूर संतभूमी बचाव संघर्ष समितीची स्थापना :
----------------------------------------------------------------------------------

पंढरपूर ;(दै. पंढरी नगरी न्यूज) : राज्य शासनाने पंढरपूरचा विकास करण्यासाठी नवीन विकास आराखडा तयार केला आहे. मंदिर परिसरात कॉरिडॉर करून भाविकांना सुखसुविधा देण्याचा राज्य सरकारचा मानस आहे. मात्र या प्रस्तावित कॉरिडॉरला पंढरपूरकरांनी विरोध केलाय. संविधानिक मार्गाने या कॉरिडोरला विरोध करण्यासाठी पंढरपूर संतभूमी बचाव संघर्ष समितीची स्थापना करण्यात आली. समितीच्या अध्यक्षपदी माजी नगरसेवक आदित्य फत्तेपूरकर यांची तर सचिव पदी हिंदू महासभेचे अभयसिंह इचगावकर यांची निवड करण्यात आली आहे. शहर - तालुक्यातील सामाजिक राजकीय क्षेत्रात कार्य करणारे प्रमुख पदाधिकारी या समितीचे सदस्य असणार आहेत.

१९६२ पासून तीन वेळा पंढरपूरचे रस्ता रुंदरीकरण तसेच इतर प्रकारे विकास करण्यात आला. यामध्ये विस्थापित झालेल्या कुटुंबांना अद्याप राहती जागा देखील मिळाली नाही. १९८५च्या विस्थापितांचे पुनर्वसन झालेले नसतानाच राज्य शासनाने नव्या कॉरिडॉरचा घाट घातलाय. या कॉरिडॉरमुळे शेकडो कुटुंब उध्वस्त होण्याची भीती व्यक्त केली जात आहे. तर छोटे मोठे व्यावसायिक देखील रस्त्यावर येणार आहेत. पंढरपूर संतभूमी बचाव संघर्ष समितीच्या वतीने विविध मार्गांनी या कॉरिडोरला विरोध करण्याचा निर्णय घेण्यात आलाय.

या समितीमध्ये विशेष निमंत्रित सदस्यांमध्ये सोलापूरचे खासदार जय सिद्धेश्वर स्वामी, राज्यसभेचे खासदार धनंजय उर्फ मुन्ना महाडिक, पंढरपूर मंगळवेढ्याचे आमदार समाधान अवताडे, विधान परिषदेचे माजी  सदस्य आमदार प्रशांत परिचारक,  सहकार शिरोमणीचे वसंतराव काळे सहकारी साखर कारखान्याचे चेअरमन कल्याणराव काळे, श्री विठ्ठल साखर कारखान्याचे चेअरमन अभिजीत आबा पाटील, राष्ट्रवादीचे युवा नेते भगीरथ दादा भालके, भाजपचे ज्येष्ठ नेते बाबासाहेब बडवे, काशिनाथ थिटे असणार आहेत.

तर सदस्यांमध्ये श्रीकांत शिंदे विक्रम शिरसट राजू उराडे, गणेश अंकुशराव, विवेक बेणारे,सौरभ थिटे गणेश पिंपळनेरकर, साईनाथ बडवे, अर्जुन चव्हाण, संतोष कवडे, किरण घाडगे,संजय दशरथ घोडके, रवी मुळे विनोद लटके, ऍड. अशितोष बडवे ऍड. राजेश भादुले ऍड. कीर्तीपाल सर्वगोड,सुधीर भोसले सुमित शिंदे, चैतन्य महाराज देहूकर, वैभव बडवे, वैभव जोशी,श्रीनिवास उपळकर, मोहम्मद उस्ताद,शिवाजी मस्के, वेंकटेश कुलकर्णी, अमृत ताठे देशमुख इ.असणार आहेत.