*पंढरपुरातील डॉ. प्रशांत निकम यांच्या ट्यूलिप सुपरस्पेशालिटी हॉस्पिटलचा मातोश्री पुष्पलता निकम यांच्या हस्ते लोकार्पण सोहळा संपन्न..*

*पंढरपुरातील डॉ. प्रशांत निकम यांच्या ट्यूलिप सुपरस्पेशालिटी हॉस्पिटलचा मातोश्री पुष्पलता निकम यांच्या हस्ते लोकार्पण सोहळा संपन्न..*

---------------------------------------------------------------------------------

पंढरपूर( पंढरी नगरी न्यूज ) पंढरपूर शहरातील  नामांकित डॉ. प्रशांत निकम यांच्या नव्यानेच बांधलेल्या ट्यूलिप सुपर स्पेशालिटी हॉस्पिटलचा इमारतीचा लोकार्पण सोहळा डॉ. प्रशांत कदम यांच्या मातोश्री पुष्पलता कदम यांच्या शुभहस्ते संपन्न झाला.

कार्यक्रमास शिक्षक आमदार दत्तात्रय सावंत सर, विठ्ठल चे चेअरमन अभिजीत पाटील ,डॉक्टर कदम यांच्या मातोश्री पुष्पलता निकम ,राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष गणेश पाटील ,पांडुरंग सहकारी साखर कारखान्याचे माजी उपाध्यक्ष दिलीप चव्हाण ,पंढरपूर नगरपालिकेचे माजी उपनगराध्यक्ष नागेश भोसले, रोहन परिचारक, यशवंतराव चव्हाण नागरी सहकारी पतसंस्थेचे संचालक रणजीत पाटील, वसंतराव काळे सहकारी साखर कारखान्याचे संचालक दिनकर कदम, अण्णा शिंदे, महाराष्ट्राच्या प्रसिद्ध भारुडकार चंदाताई तिवारी तसेच पंढरपुरातील नामांकित डॉक्टर मंडळी, सामाजिक ,क्रीडा राजकीय, क्षेत्रातील सर्वच पदाधिकारी मोठ्या संख्येने कार्यक्रमास उपस्थित होते.

पंढरपूर मध्ये आता भव्य मोठी अद्यावत, अत्याधुनिक अशी सर्व सोयीयुक्त हॉस्पिटलची सुसज्य देखणी भव्य इमारत उभारली असून हॉस्पिटलमध्ये अनुभवी कर्मचारी स्टाफ ज्यादा भरती करण्यात आला  आहे .