तावशी येथील साधना विद्यालयात मारापुर ग्राम पंचायतीचे नूतन सरपंच विनायक यादव सत्कार सोहळा उत्साहात संपन्न..!

तावशी येथील साधना विद्यालयात मारापुर ग्राम पंचायतीचे नूतन सरपंच विनायक यादव सत्कार सोहळा उत्साहात संपन्न..!

------------------------------------------------------------------------------------          
तावशी दै.(पंढरी नगरी न्युज ) : पंढरपूर तालुक्यातील तावशी येथील साधना विद्यालय व जुनिअर कॉलेज मध्ये मंगळवेढा तालुक्यातील मारापुर ग्रामपंचायत निवडणूक अटीतटीची झाली होती. या निवडणुकीमध्ये पंढरपूर - मंगळवेढा मतदारसंघाचे आमदार समाधान अवताडे यांच्या पॅनलने मारापुर ग्रामपंचायत वर आमदार समाधान आवताडे यांच्या मार्गदर्शनाखाली मारापूरचे तरुण युवक अवताडे गटाचे निष्ठावंत प्रमुख कार्यकर्ते उद्योजक विनायक यादव यांनी ही निवडणूक मोठ्या हिमतीने लढवली होती. त्यामध्ये त्यांना मोठ्या प्रमाणात यश आले होते.

उद्योजक विनायक यादव यांनी गावातील गोरगरीब नागरिकांची कामे केल्यामुळेच त्यांना या निवडणुकीत सरपंच म्हणून गावातील नागरिकांनी मोठ्या मताधिक्याने निवडून दिले .नूतन सरपंच विनायक यादव यांचे माध्यमिक शिक्षण तावशी येथील साधना विद्यालयात झाले असून ते या विद्यालयाचे माजी विद्यार्थी असल्याने सरपंच पदी निवड झाल्याने त्यांचा साधना विद्यालय व जुनिअर कॉलेज मध्ये जंगी सत्काराचे आयोजन करण्यात आले होते .

१९९६ इयत्ता १० वी बॅच तर्फे यावेळी तावशीचे आदर्श सरपंच गणपत यादव, विठ्ठल चे माजी संचालक सुनील आसबे, तावशी सोसायटीचे माजी चेअरमन सरकार  यादव, दामाजीचे माजी संचालक भुजंगराव आसबे, राजाराम सुडके, संभाजी कुरे, आबा वाघमारे, राजकुमार यादव माजी सरपंच बाळासाहेब कोळी , प्रगतशील बागायतदार विजयकुमार यादव विविध संस्थांचे  चेअरमन दादा यादव , पोपट आसबे, संतोष आसबे ,अशोक  आसबे ,बिरुदेव देवळे ,नाथा माने, बालाजी यादव ,सिद्धेश्वर यादव ,निलेश आसबे सर्व नवनिर्वाचित सदस्य तसेच आमित यादव ,वसंत पिसे ,सोमनाथ शिंदे, सतीश वाघमारे ,बाबू वाघमारे, साहेबराव आसबे ,बाबा यादव.  संतोष यादव आदी उपस्थित होते .या  कार्यक्रमाचे प्रास्ताविक सुनील आसबे  व सूत्रसंचालन दादासाहेब इंगोले यांनी केले.