तुळजापूर नवोदय विद्यालयात माजी विद्यार्थी स्नेह मेळावा संपन्न..

तुळजापूर नवोदय विद्यालयात माजी विद्यार्थी स्नेह मेळावा संपन्न..

---------------------------------------------------------------------------------

तुळजापूर( दै.पंढरी नगरी न्यूज) : जवाहर नवोदय विद्यालयात रविवार दि.१८ रोजी माजी विद्यार्थी स्नेह मेळावा संपन्न झाला. या कार्यक्रमाचे उद्घाटन विद्यालयाचे प्राचार्य  गंगाराम सिंह यांच्या हस्ते दीप प्रज्वलन व सरस्वती पूजनाने करण्यात आली.

याप्रसंगी विद्यालयातील सर्व शिक्षक, शिक्षिका, शिक्षकेतर कर्मचारी, माजी विद्यार्थी उपस्थित होते .सर्व माजी विद्यार्थ्यांचे गुलाब पुष्प देऊन स्वागत करण्यात आले. विद्यालयाचे प्राचार्य गंगाराम  सिंह  यांनी कार्यक्रमाचे प्रास्ताविक करून विद्यालयाच्या विकासाचा आढावा माजी विद्यार्थ्यांच्या समोर मांडला. माजी विद्यार्थी डॉ. रामेश्वर यादव , हनुमंत शिंदे या माजी विद्यार्थ्यांनी आपले जुने अनुभव व्यक्त करताना म्हणाले, की पूर्वेचे शैक्षणिक वातावरण व आताच्या वातावरणामध्ये खूप फरक आहे.

नवोदय विद्यालय हे भारतातील सर्वश्रेष्ठ विद्यालय असून यामधून विद्यार्थ्यांचे व्यक्तिमत्त्वाची जडणघडण अतिशय उत्तम प्रकारे होत असते. तुम्ही स्वतः आत्मविश्वासी बनवून प्रामाणिकपणे कार्य करा तशाच पद्धतीने माणुसकी जागी ठेवून स्वतः परिश्रम घ्या आणि स्वतःची ओळख स्वतः निर्माण करा. दुसऱ्यावरती अवलंबून राहू नका. नवोदय विद्यालयात मिळालेली ही संधी अतिशय उत्तम संधी आहे या संधीचा फायदा घेऊन तुमचे भविष्य बनवा अशा प्रकारचे आवाहन माजी विद्यार्थ्यांनी केले. कार्यक्रमाचे संचलन  एच. जी. जाधव यांनी तर आभार प्रदर्शन वरिष्ठ अध्यापक एस. एच. गायकवाड यांनी केले.