राज्यातील सव्वा लाख विद्यार्थ्यांचे नुकसान ,कारण शिष्यवृत्ती अर्ज महाविद्यालय कडे प्रलंबित..
-------------------------------------------------------------------------------------
पुणे (दै.पंढरी नगरी न्युज )भारत सरकारने मॅट्रिकोतर शिष्यवृत्ती योजनेअंतर्गत अनुसूचित जाती प्रवर्गातील विद्यार्थ्यांसाठी महाबिडीटीच्या संकेतस्थळावर शिष्यवृत्तीचे ऑनलाईन अर्ज भरण्याची सुविधा उपलब्ध करून देण्यात आली आहे .मात्र ऑनलाईन अर्ज करणे राज्यातील सुमारे १ लाख २३ हजार विद्यार्थ्यांचे शिष्यवृत्तीचे अर्ज महाविद्यालयाने प्रलंबित ठेवले असल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे .
विशेष म्हणजे समाज कल्याण विभागाने वारंवार सूचित करू नये महाविद्यालयाने याकडे पूर्णता कानाडोळा केला असल्याने समाज कल्याण विभागाने आता कारवाईचा बडगा उगारला आहे .ज्या महाविद्यालयाकडे मोठ्या प्रमाणावर अर्ज प्रलंबित आहेत .त्यांना जिल्हाधिकाऱ्यामार्फत नोटीस देऊन महाविद्यालयाची मान्यता रद्द करण्याचा प्रस्ताव शासनास सादर करण्याचे निर्देश दिले आहेत. अनुसूचित जाती व न बद्दल प्रवर्गातील विद्यार्थ्यांसाठी केंद्र व राज्य शासनाकडून संयुक्तपणे मॅट्रिक तर शिष्यवृत्ती प्रदान केली जाते. महाबीडीटीसाठी संकेतस्थळावर शिष्यवृत्तीचे नवीन अर्ज भरण्यासाठी अनुसूचित जाती प्रवर्गासाठी वेळोवेळी मुदत वाढ देण्यात आली आहे.
सन २०२२-२३ मध्ये अनुसूचित जाती व नवबौद्ध संवर्गातील आतापर्यंत राज्यातून २ लाख ९० हजार अर्जाची ऑनलाईन नोंदणी झाली आहे त्यापैकी समाज कल्याण विभागाकडे प्राप्त झालेली एक लाख ४२ हजार अर्ज मंजूर करण्यात आले आहेत तर १ लाख २३ हजार अर्ज महाविद्यालयाकडेच प्रलंबित असल्याने त्यावर समाज कल्याण विभागास कारवाई करता आली नाही तसेच २० हजार अर्ज हे विद्यार्थी स्तरावर प्रलंबित आहेत .त्यांनी महाविद्यालयाकडे अर्ज सादर केले नाहीत असेही तपासणी चौकशी केली असता दिसून आले आहे.
विशेष म्हणजे २०२१- २२ मध्ये एकूण चार लाख२३ हजार विद्यार्थ्यांना शिष्यवृत्ती प्रदान करण्यात आली होती त्यापैकी ३० जानेवारी २०२३अखेर फक्त २ लाख ९० हजार अर्जांची म्हणजेच ६९ टक्के अर्जाचीच ऑनलाईन नोंदणी झाली आहे .त्यामुळे लाखो विद्यार्थ्यांनी अद्याप भारत सरकार शिष्यवृत्तीसाठी नोंदणीच केले नसल्याची बाब समोर आली असून नोंदणी केल्यापैकी १ लाख २३ हजार अर्ज देखील महाविद्यालयाकडेच कलंबित असल्याने शिक्षण विभागात मोठी खळबळ उडाली आहे.