आमदार समाधान आवताडे यांच्या मार्गदर्शनाखाली मतदारसंघात रस्ते उद्घाटनाचा सपाटा
---------------------------------------------------------------------------------
रस्ते वीज पाणी शिक्षण आरोग्य आदींसाठी आपण निधी मागण्यास कुठे कमी पडू नका सभापती सोमनाथ मालक आवताडे
---------------------------------------------------------------------------------
पंढरपूर (दै.पंढरी नगरी न्युज ) : पंढरपूर व मंगळवेढा तालुक्याचे आमदार समाधान दादा अवताडे यांनी आपल्या मतदारसंघात सध्या रस्ते वीज पाणी शिक्षण आरोग्य आदी कामांना भरघोस असा निधी आणून नुसता धमाक सुरू केला असून आज दि.२६ फेब्रुवारी रोजी पंढरपूर तालुक्यातील उंबरगाव येथील खंडोबा वस्ती ते बाळू चव्हाण वस्ती रस्त्याचे भूमिपूजन सोहळा मंगळवेढा कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती सोमनाथ आवताडे यांच्या हस्ते नारळ फोडून करण्यात आला यावेळी सभापती महोदय यांनी बोलताना सांगितले की आपण कामे मागण्यास कुठे कमी पडू नका आमदार साहेबांच्या माध्यमातून आम्ही कामासाठी निधीची कमतरता पडू देणार नसल्याचे आश्वासन त्यांनी यावेळी बोलताना सांगितले.
पंढरपूर मंगळवेढा तालुक्याचे आमदार समाधान दादा अवताडे यांनी मतदारसंघात अल्पवधी काळात जनतेच्या गरजा लक्षात घेता पाणी रस्ते वीज आरोग्य शिक्षण आधी कामे करण्याचा सपाटा लावला आहे .आज आमदार साहेब यांचे बंधू मंगळवेढा कृषी उत्पन्न बाजार समितीचे बेस्ट सभापती सोमनाथ मालक अवताडे यांच्या हस्ते भूमिपूजन सोहळा संपन्न झाला.
एकच ध्यास जनतेचा सर्वांगीण विकास
पंढरपूर व मंगळवेढा तालुक्यचा कायापालट करण्याचा मानस उरासी बाळगत पंढरपूर आणि मंगळवढा तालुक्यातील कायापालट करण्यासाठीं आपल्या मतदार संघात अल्प वधी काळातच झेप भरारी घेत आमदार समाधान दादा आवताडे यांनी विकासा कडे वाटचाल सुरू केली. सदर प्रसंगी दिगंबर पवार सर, किसन पवार, सरपंच अशोक चंदनशिवे, उपसरपंच बाळासो पवार, अंकुश चव्हाण रमेश चंदनशिवे मेंबर शंकर चंदनशिवे, रामभाऊ पवार, गोपीनाथ पवार, विश्वजीत पवार, सुधाकर जाधव - पाटील, अजित पवार, पांडुरंग चव्हाण, दीपक जाधव मेंबर, सागर खरात, दिगंबर यादव मामा, खरात कॉन्ट्रॅक्टदार, मुखरे भाऊसाहेब, साहेबराव चंदनशिवे, प्रकाश पवार, विजय पवार आदी मान्यवर उपस्थित होते.