४ लाख भाविकांच्या उपस्थित माघी जया एकादशी सोहळा साजरा..

४  लाख भाविकांच्या उपस्थित माघी जया एकादशी सोहळा साजरा..

------------------------------------------------------------------------------------
भाविकांसाठी ज्यादा एसटी बसची सोय करण्यात आली होती.
------------------------------------------------------------------------------------

पंढरपूर( दै. पंढरी नगरी न्युज ) : पंढरपूर येथे मागी शुद्ध जया एकादशी निमित्त मंदिर समितीच्या वतीने श्री विठ्ठल रुक्मिणी मातेची नित्य पूजा संपन्न झाली. श्री विठ्ठलाचे नित्य पूजा मंदिर समितीच्या सदस्या शकुंतला नडगिरी यांनी कुटुंबीयांसमोर रुक्मिणी मातीचे नित्य पूजा मंदिर समितीचे सदस्य डॉ. दिनेश कदम यांच्या हस्ते संपन्न झाली. मागे एकादशी निमित्त श्री विठ्ठल रुक्मिणीच्या दर्शनासाठी पंढरपुरात सुमारे चार लाख फोन अधिक भाविक दाखल झाले होते .त्यामुळे विठुरायाची पंढरी नगरी भक्तांनी फुलून गेली होती माघी जय एकादशीला विविध राज्यातील सुमारे चार लाखाहून अधिक भाविक पंढरीत दाखल झाले होते.

भाविकांना सुलभ दर्शन व्हावे यासाठी मंदिर समितीच्या वतीने आवश्यक त्या उपाययोजना करण्यात आल्या होत्या मंदिर समितीच्या वतीने दर्शन रांगेत व दर्शन मंडपात स्वच्छ पिण्याचे पाणी शौचालय लाईव्ह दर्शन इत्यादी सुविधा उपलब्ध करून देण्यात आल्या होत्या. कायमस्वरूपी व तात्पुरत्या स्वरूपात १०० सीसीटीव्ही कॅमेरे लावण्यात आले होते. दर्शन रांग दर्शन मंडप मंदिर व मंदिर परिसर या ठिकाणची वेळोवेळी स्वच्छता करण्यात येत होती .दर्शनासाठी येणाऱ्या भाविकांसाठी मंदिर समितीच्या वतीने विमा काढण्यात आला आहे. श्री संत ज्ञानेश्वर दर्शन मंडप येथे चौकशी कक्ष करण्यात आला होता .त्यासाठी मराठी इंग्रजी हिंदी कन्नड व तेलगू भाषा अवगत असलेली कर्मचारी नियुक्त करण्यात आलेले होते दर्शन रांगेत मोफत खिचडी व चहा वाटप करण्यात येत आहे.

चंद्रभागा वाळवंट व पत्रा शेड येथे महिला भाविकांच्या सोयीसाठी चेंजिंग रूम व दर्शन रांगेत हिरकणी कक्ष उघडण्यात आले होते. ६५ एकर नधिक क्षेत्र प्रशिक्षण मार्ग मंदिर परिसर व शहरातील इतर ठिकाणी पालिकेच्या वतीने वेळोवेळी स्वच्छता करण्यात आली .पोलीस प्रशासनाच्या वतीने भाविकांच्या सुरक्षेतेसाठी पोलिसांचा कडे कोट सुरक्षा व्यवस्था करण्यात आली होती .हरिनामाच्या जय घोषात आणि टाळ मृदंगांच्या गजरात अवघी पंढरी नगरी दुमदुमून गेली होती. पहाटेपासूनच चंद्रभागेचे पात्र भाविकांनी फुलून गेले होते .चंद्रभागा भाविक पवित्र स्नान करून परंपरेनुसार शेकडो वारकरी दिंड्यासह प्रदक्षिणामार्गावर विविध संतांचे अभंग म्हणत प्रदक्षिणा पूर्ण केली.