मंगळवेढा पोलीसांची उत्कृष्ट कामगिरी ३ जबरी चोरी व २ चोरी असे एकुन ५ गुन्हे उघडकीस अटक आरोपीकडुन १ लाख ९० हजार रुपयांचा मुददेमाल जप्त
--------------------------------------------------------------------------------
मंगळवेढा तालुका पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक रणजीत सिंह माने व सहकाऱ्यांचे तमाम जनतेमधून कौतुक --------------------------------------------------------------------------------
मंगळवेढा ( दै .पंढरी नगरी न्यूज ) : जबरी चोरी १ मंगळवेढा पोलीस ठाणे गुर में ३८५/२०२२ मा द वि कलम ३९२. ३४ या गुन्हातील दि १८/०५/२०२२ रोजी सकाळी ०७५/०० तेदुपारी १२/३० या दरम्यान फिर्यादी नामे बैजनाथ जनार्दन शिंदे वय २४ वर्षे, व्यवसाय खाजगी नौकरी, रा कुंभार गल्ली, मंगळवेढा हे भारत फायनान्स मध्ये लोन ऑफिसर म्हणून नेमणुकीस असुनते भोसे येथून बचतगटाचे वेगवेगळ्या ठिकाना वरुन पैसे घेवुन मंगळवेढा येथे येत असताना पाठखळ रोडवरील सांगोलानाका येथेदुपारी ०१/३० वा आले असता त्यांचे पाठी मागुन एका युनिकॉर्न गाडीवरून अनोळखीदिन इसमांनी त्यांचा पाठलाग करुन सांगोला नाका जव चाकू चा धाक दाखवून फिर्यादीकडील ४५,३५६ रुपये रोख रक्कम व एक टॅबतसेच बायोमेटिक मशीन असलेली बॅग हिसकावून गणेशवाडीच्या दिशेने मोटारसाकल वरती पळुन गेले वगैरे मजकुराप्रमाणे हकिगत असुन मंगळवेढा स्टेशन गु.र.नं ३८५/२०२२ भादवी कलम ३९२.३४ प्रमाणे गुन्हा दाखल आहे.
सदर गुन्हयाच्या तपासकामी पोलीस निरीक्षक रणजीत माने यांनी डिबी पाकाला आदेश देवून एक टीम तयार केली तसेच गोपणीय बातमीदारामार्फत माहीती घेतली असता संशयीत तिन आरोपी ताब्यात घेवुन त्यांचेकडे कसून चौकशी केली असता आरोपीतांनी गुन्हा केल्याची कबुली दिली. सदर गुन्हयात तिन आरोपी अटक करुन त्यांचेकडुन गेला रकमेपैकी एकून २५ हजार रुपये रोख रक्कम व मुन्हयात पापरलेली युनिकॉर्न दुचाकी मोटारसायकल ५ हजार रुपये किमतीचे गाडी जप्त करण्यात आली असून असे एकुन ४ लाख रुपये किंमतीचा मुददेमाल जप्त करण्यात आला आहे. (टिप आरोपीची ओळख परेड होगे बाकी असल्याने आरोपीची नावे जाहीर केले नाही.)
जबरी चोरी क्र. २. मंगळवेढा पोलीस ठाणे गुर नं १९०/२०२२ भादवि कलम ३९४.३४ दि ११/०३/२०२२ रोजी २३/४५ वा दरम्यान यामधील फियादी नामे महादेव चिंतु लेडवे वय ३० वर्षे, रा- लंडवे चिंचाळे, मंगळवेढा हे घरी जेवनकरून झोपले असता दोन इसम मध्यम उधिये सावळया रंगाचे अंगात हाफ काळया रंगा टी शर्ट हरफ काळया रंगाचे मुंडे पातलेले अनोळखी इसमांनी हातात कोयत्याने फिर्यादीच्या डोक्यात मारुन फिर्यादीच्या खिशातील मोबाईल व पैसे जबरदस्तीने काढून घेतले तसेच फिर्यादी यांची पत्नी हिचे गळ्यातील २० हजार रुपये किमतीचे मंगळसुत्रातील मनी जबरीने चोरी करून घेवुन गेले म्हणुन वरील मजकुराप्रमाणे गुन्हा नोंद आहे.
सदर गुन्हयाच्या तपास कामी पोलीस निरीक्षक रणजीत माने यांनी डिबी पथकाला आदेश देवुन टीम तयार केली तसेच गोपनीय बातमीदारामार्फत माहीती घेतली असता संशयीतएक आरोपी ताब्यात घेवुन त्यांचेकडे कसून चौकशी केली असता आरोपी गुन्हा केल्याची कबुली दिली. सदर गुन्हयात एक आरोपी अटक करुन त्यांचेकडुन गेला मालापैकी ३ ग्रॅम वजनाचे १५ हजार रुपये किमतीचे सोन्याचे मनी जप्त करण्यात आले आहेत.
जबरी चोरी क्र ३. पंढरपुर ग्रामीण पोलीस स्टेशन पंढरपुर येथे गु.र.नं ३०५ / २०२२ भादवी ३९२ ३४ प्रमाणे दि १२/०७/२०२२ रोजीदुपारी ०४/०० से ०४/१५ वा दरम्यान मौजे भंडीशेगावता- पंढरपुर, मालवणी ते पंढरपुर येणाऱ्या रोड पर सातारानाल्याजवळ दोन अज्ञात चोरटयांनी मोटार सायकलवर येवुन फिर्यादीच्या संमती शिवाय लबाडीने फिर्यादीच्या मोटारसायकला लाथ मारून फिर्यादीकडील बॅग हिसकावुन रक्कम रुपये १,६८,२४० रुपये रोख रक्कम, एक टॅब चोरुन नेली आहे वगैरे मजुराच्या हकिगतीप्रमाणे गुन्हा दाखल आहे. जबरीचोरी १ मधील अटके मधील आरोपीकडे अधिक तपास केला असता आरोपीने पंढरपुर ग्रामीण पोलीस स्टेशन हद्दीमधील जबरी चोरी केल्याची कबुली दिली. सदरील जबरी चोरी मधील फिर्यादीनेच आरोपीशी संगणमत करून जबरी चोरी करण्याचा बनाव करून जबरी चोरी केल्याची कबुली दिली.
चोरीक ४. मंगळवेढा पोलीस स्टेशन गु.र.नं. ७/२०२३ भादवीकलम ३७९ प्रमाणे दि ०२/०१/२०२३ रोजी दुपारी ०२/०० ते ०२/१० या दरम्यान फिर्यादी नामे मयुर महादेव पाटील वय-२९ वर्षे रा डोंगरगाव ता मंगळवेढा हा मंगळवेढा शहरातील मंगळवेढा ते पंढरपुर जाणाऱ्या रोडवरील सम्राट मोटार या दुकाना समोर फियादी यांनी लावलेली त्यांची ज्युपिटर मोटारसाकल एमएच १३ सीई ५३८८ च्या डिक्कीमध्ये ठेवलेली एक लाख रुपये रोख रक्कम असेलेली कॅरिबॅग कोणी तरि अज्ञात चोरटयाने बनावट चावीच्या सहाय्याने डिक्की उघडुन चोरुन नेली आहे म्हणुन अज्ञात चोरटयाविरुध्द वरील मजकुराप्रमाणे गुन्हा दाखल आहे.
सदर गुन्हयाच्या तपासकामी पोलीस निरीक्षक रणजीत माने यांनी डिबी पथकाला आदेशदेवुन टीम तयार केली तसेच गोपणीय बातमीदारामार्फत माहीती घेतली असता संशयीत तिन आरोपी ताब्यात घेवुन त्यांचेकडे कसून चौकशी केली असता आरोपीतांनी गुन्हा केल्याची कबुली दिली. सदर गुन्हयात तिन आरोपी अटक करुन त्यांचेकडुन गेला रकमेपैकी एकुन ३५ हजार रुपये रोख रक्कम जप्त करण्यात आला आहे. (टिप- आरोपीची ओळख परेड होणे बाकी असल्याने आरोपीची नावे जाहीर केले नाही.)
चोरीक ५ मंगळवेढा पोलीस स्टेशन गु.र.नं १३८ / २०२३ भादयीकलम ३७९ प्रमाणेदि १०/०२ / २०२३ रोजी दुपारी ०४/०० वा सुमारास यामधील फिर्यादी नामे निवेश बाजु रणखांबे वय - ३३२ वर्षे, चंदा नोकरी, रा- साठेनगर,
मंगळवेढा हे मंगळवेढा नगरपालीकेमध्ये बांधकाम विभागात क्लर्क म्हणुन नोकरी असुन ते नागणेवाडी येथील तलावाच्या शेजारी असणाऱ्या ओपन जीम पाहण्यासाठी गेलो असता तेथे त्यांना जीममधील काही साहीत्य आहे.
लावलेल्या ठिकानी दिसुन आले नाही त्यानंतर त्यांनी वरिष्ठांना कळवून २ लाख रुपये किमतीचे ओपन जीमचे साहीत्य कोणीतर अज्ञात चोरटयाने चोरुन नेले असल्याबाबत गुन्हा दाखल आहे.
सदर गुन्हयाच्या तपासकामी पोलीस निरीक्षक रणजीत माने यांनी डिबी पथकाला आदेशदेवुन टीम तयार केली तसेच गोपणीय बातमीदारामार्फत माहीती घेतली असता संशयीत आरोपी ताब्यात घेवुन त्यांचकडे कसून चौकशी केली असता आरोपीने गुन्हा केल्याची कबुली दिली. तसेच आरोपीकडुन ४० हजार रुपये किमतीचा गेला.
माल जप्त करण्यात आला आहे. सदर गुन्हयामध्ये एकुन ६ आरोपी अटक करून त्यांचे कडून एकुन चार गुन्हयातील 1,90,000/- रुपये किमतीचा मुददेमाल जप्त करण्यात आला आहे. सदरची कामगिरी ही विशेष पोलीस महानिरीक्षक, कोल्हापुर परिक्षेत्र श्री. सुनिल फुलारी सो. पोलीस अधिक्षक सोलापुर ग्रामीण श्री शिरीष देशपांडे सो, अपर पोलीस अधिक्षक हिंमत जाधव उपविभागीय पोलीस अधिकारी श्री विक्रम कदम, उपविभागीय पोलीस अधिकारी श्रीमत राजश्री पाटील मॅडम यांचे मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक रणजीत माने, मंगळवेढा पोलीस ठाणे, सपोनि बापु पिंगळे, पोहेकॉ / दयानंद हेंबाडे, पोहेकॉ / हजरत पठाण, पोना सुनिल मोरे, पोकों अजित मिसाळ, पोकों अजय शिंदे, पोकों वैभव घायाळ सायबर पोलीस स्टेशनकडील पोना युसुफ पठाण यांनी गुन्हयाचा कौश्यल्यपुर्ण तपास करुन गुन्हयातील गेला माल हस्तगत करण्यात व तपासकामी मदत केली आहे.