पंढरपूर अर्बन बँकेच्या वतीने कै. देशभक्त बाबुरावजी जोशी व्याख्यानमालेचे पंढरपुरात आयोजन!
---------------------------------------------------------------------------------
पंढरपूर( दै. पंढरी नगरी न्युज) : पंढरपूर येथील दि पंढरपूर अर्बन को-ऑपरेटिव बँक पंढरपूर या बँकेने विधान परिषदेचे माजी सदस्य तथा पांडुरंग सहकारी साखर कारखान्याचे चेअरमन प्रशांतराव परिचारक यांच्या मार्गदर्शनाखाली बँकेच्या सभासदांची हित जोपासत मोठी आर्थिक प्रगती केली असून बँकेची यशस्वी वाटचाल सभासदांच्या विश्वासामुळे १११ व्या वर्षात पदार्पण करीत असून करीत असून प्रतिवर्षीप्रमाणे या बँकेने सहकार सप्ताहाचे औचित्य साधून कै.देशभक्त बाबुरावजी जोशी व्याख्यानमालीचे आयोजन करण्यात आल्याचे बँकेचे माहिती मुख्य कार्यकारी अधिकारी उमेश विरधे यांनी दिली.
शुक्रवार दिनांक १९ नोव्हेंबर २०२२ रोजी सहकार सप्ताहाचे औचित्य साधून बँकेचे सभासद ग्राहक हितचिंतक यांचे विविध प्रश्नांवर विचार मंथन होऊन समाज प्रबोधन व्हावे यासाठी बँकेचे चेअरमन प्रशांतराव परिचारक यांच्या मार्गदर्शनाखाली व्याख्यानमालेचे आयोजन केले असून याकरिता शुक्रवार दिनांक १९ नोव्हेंबर रोजी मिरज येथील प्रसिद्ध व्याख्याते डॉ. अनिल मडके, श्वसन विकार तज्ञ यांचे "कोरोना नंतरचे जीवन काळजी व सुरक्षितता, या विषयावर, तर शनिवार दिनांक १९नोव्हेंबर २०२२ रोजी पुणे येथील डॉ. शैलेंद्र देवळाणकर परराष्ट्र नीतीचे अभ्यासक यांचे "भारतीय परराष्ट्र निधीची ७५ वर्षे ,या विषयावर तसेच रविवार दिनांक २० नोव्हेंबर २०२२ रोजी सुप्रसिद्ध अभिनेता प्रवीण तरडे मुंबई यांचे मराठी चित्रपट सृष्टी या विषयावर व्याख्यान होणार आहे.
अर्बन बँकेच्या संयुक्त विद्यमाने मध्यवर्ती गणेश उत्सव व नवरात्र उत्सव मंडळाच्या पारितोषिक वितरण समारंभ कार्यक्रम होणार असून कार्यक्रमास सोलापूर जिल्हा निबंधक तथा मध्यवर्ती सहकारी बँकेचे प्रशासक कुंदन भोळे यांच्या शुभहस्ते रविवार दि. २० रोजी कार्यक्रमाचे ठिकाण कवठेकर प्रशाला नाथ चौक पंढरपूर या ठिकाणी सदर कार्यक्रम होणार असून कार्यक्रमास पंढरपूर शहर व तालुक्यातील बँकेचे सभासद हितचिंतक. नागरिक .व्याख्यान प्रेमी रसिक यांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहण्याचे आवाहन बँकेचे व्हाईस चेअरमन दीपक शेटे तसेच बँकेचे सर व्यवस्थापक राम उन्हाळे यांनी केले आहे.