पंढरीत... मराठा आरक्षणा साठी आमरण उपोषण सुरू, जालन्याचे पडसाद पंढरपुरात

पंढरीत... मराठा आरक्षणा साठी आमरण उपोषण सुरू, जालन्याचे पडसाद पंढरपुरात

---------------------------------------------------------------------------------

पंढरपूर( पंढरी नगरी न्यूज ) मराठा आरक्षणासाठी जालना जिल्हा येथील मनोज जरांगे -पाटील यांचे आमरण उपोषण सुरू असतानाच आत्ता पंढरपूर येथे गणेश जाधव या युवकाने येथील तहसील कार्यालयासमोर आमरण उपोषण सुरू केले आहे.

जरांगे - पाटील यांचे मराठा आरक्षणासाठी सुरू असलेल्या उपोषण स्थळी पोलिसांकडून लाठीचार्ज झाल्यानंतर मराठा आरक्षणाची मागणी पुन्हा एकदा जोर धरू लागली आहे.  यासाठी संपूर्ण महाराष्ट्रातून   आंदोलनाचा भडका उडाला आहे. यामध्ये  गाव बंद आंदोलन, रस्ता रोको , निषेध मोर्चा अशा विविध प्रकारचे आक्रमक आंदोलने सध्या संपूर्ण महाराष्ट्रात सुरु आहेत .हि आंदोलने नियंत्रित करताना प्रशासन व पोलिसांची दमछाक होत आहे.

पंढरपूर तालुक्यातील लक्ष्मी टाकळी येथील गणेश जाधव हा तरुण  सकल मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी पंढरपूर येथील  तहसील कार्यालयासमोर आज शुक्रवार दि. ८ रोजी आमरण उपोषणास बसला आहे. याबाबत त्यांनी  दि. ६ रोजी त्यांनी तसे प्रशासनास निवेदन देऊ  आहे.
****************************************************
आरक्षण मिळेपर्यंत उपोषण सकल मराठा समाजाला आरक्षण मिळावे. यासाठी तहसील कार्यालयासमोर आपण आमरण उपोषणाला बसलो असून सकल मराठा समाजाला आरक्षण मिळेपर्यंत   आपण उपोषणावर ठाम राहणार आहे.