भीमा साखर कारखान्याचा बुधवार दि.५ रोजी ४३ वा.बाँयलर अग्नीप्रदीपन सोहळा समारंभ..

भीमा साखर कारखान्याचा बुधवार दि.५ रोजी ४३ वा.बाँयलर अग्नीप्रदीपन सोहळा समारंभ..

----------------------------------------------------------------------------------

मोहोळ(तालुका प्रतिनिधी):- टाकळी सिकंदर येथील भीमा सहकारी साखर कारखान्याचा ४३ वा गळीत हंगामाचा बॉयलर अग्नी प्रदीपन समारंभ आज बुधवार दिनांक ५ ऑक्टो. २०२२ रोजी सकाळी संपन्न होणार असल्याची माहिती कारखान्याचे कार्यकारी अधिकारी  सूर्यकांत शिंदे यांनी दिली.

कारखान्याचे चेअरमन तथा खासदार धनंजय उर्फ मुन्ना साहेब महाडिक व त्यांच्या सुविद्य पत्नी अरुंधती धनंजय महाडिक यांच्या शुभहस्ते बॉयलरचा अग्नी प्रदीपन समारंभ कार्यस्थळावर संपन्न होणार आहे. तरी कार्यक्रमास संचालक. शेतकरी सभासद. कर्मचारी .अधिकारी यांनी मोठ्या संख्येने उपस्थित रहावे असे आवाहन कारखान्याचे कार्यकारी अधिकारी शिंदे यांनी केले.