शिवसेनेचे सचिव मिलिंद नार्वेकर यांनी घेतले सपत्नीक विठ्ठल रुक्मिणी मातेचे दर्शन

शिवसेनेचे सचिव मिलिंद नार्वेकर यांनी घेतले सपत्नीक विठ्ठल रुक्मिणी मातेचे दर्शन

-----------------------------------------------------------------------------------

पंढरपूर (पंढरी नगरी न्यूज ) : उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचे महाराष्ट्राचे  शिवसेना सचिव  मिलिंदजी नार्वेकर हे पंढरपूर दौऱ्यावर आले असताना यांनी आषाढी यात्रेच्या निमित्ताने आज सपत्निक श्री विठ्ठल रूक्मिणी मातेचे दर्शन घेतले. त्यानंतर श्री विठ्ठल रूक्मिणी मंदिरे समितीच्या वतीने  मिलींदजी नार्वेकर यांचा सत्कार मंदिरे समितीचे सहअध्यक्ष ह.भ.प. श्री गहीनीनाथ महाराज औसेकर व शिवसेना जिल्हा प्रमुख पंढरपूर विभाग व  श्री विठ्ठल रूक्मिणी मंदिरे समिती सदस्य संभाजीराजे शिंदे यांच्या हस्ते “श्रीं” चे उपरणे व दैनंदिनी देऊन करण्यात आला.

त्यावेळी श्री गितेश राऊत, श्री अंकुश चव्हाण, श्रीरंग औसेकर महराज व मंदिरे समितीचे सदस्य ह.भ.प. श्री ज्ञानेश्वर जळगांवकर महाराज व मंदिरे समिती कर्मचारी उपस्थित होते.