सरकोलीत अवैध वाळू वाहतूक उपशाला दिवसरात्र सुरुवात

सरकोलीत अवैध वाळू वाहतूक उपशाला दिवसरात्र सुरुवात

---------------------------------------------------------------------------------

पंढरपूर तहसील कार्यालयातील प्रशासन बघ्याच्या भूमिकेत,आम आदमी पार्टीची जिल्हाधिकारी कारवाई करण्याची मागणी
---------------------------------------------------------------------------------

पंढरपूर (दै. पंढरी नगरी न्यूज) पंढरपूर तालुक्यातील सरकोली येथील भीमा नदीच्या पत्रातील अवैद्य वाळू उत्खनन करणाऱ्या वाळू माफीया यांनी अक्षरशा :भीमा नदीच्या पात्रातील मोठ्या प्रमाणात वाळूचा उपसा केल्याने नदीच्या पात्राची चाळण झाली आहे. या अवैध्य वाळू उपशा करणाऱ्या वाळू चोरावर त्वरित कारवाई करण्याची मागणी आम आदमी पक्षाचे सोलापूर जिल्हा उपाध्यक्ष राजेंद्र भोसले यांनी सोलापूरचे जिल्हाधिकारी मिलिंद शंभरकर व जिल्हा पोलीस प्रमुख शिरीष कुमार सरदेशमुख यांच्याकडे लेखी निवेदनाद्वारे केली आहे.

वाळू माफीया हे या पत्रातील वाळूची दिवसरात्र मोठ्या प्रमाणात वाळूची तस्करी ट्रॅक्टर आणि लारी च्या साह्याने नदीच्या काठावर साठा करून अवैद्य वाळू उपसा केला जातो. याचबरोबर तालुक्यात अनेक ठिकाणी बेसुमार वाळू उपसा होत असल्याच्या तक्रारी व त्याच्यावर होत असलेली पोलीस कारवाई वारंवार होत दिसत आहेत त्यातच सरकोली येथे भीमा नदीच्या पात्रातून वाळू तस्कर  ट्रॅक्टर आणि यारी च्या साह्याने अवैद्य वाळू उपसा केला जातो. वाळू तस्कर हे गाव व परिसरात वाळूची जादा दराने विक्री करत आहेत. अशा प्रकारचा अवैद्य वाळू उपसा सरकोली गावात सध्या दिवस-रात्र सुरू असून त्याकडे पंढरपूर महसूल विभाग गातील कर्मचारी बघ्याच्या भूमिकेत दिसत असल्याचे राजेंद्र भोसले यांनी आरोप करून याबाबत आपण संबंधित महसूल विभागाचे तलाठी भाऊसाहेब यांच्याकडे या संदर्भात विचारणा केली असता त्यांनी वरिष्ठ अधिकाऱ्यांना विचारा असे सांगितल्यामुळे महसूल विभागातील वरिष्ठ अधिकाऱ्यास बाबत संशय व्यक्त होत असून एखाद्या गावात पदाधिकाऱ्याने किंवा नागरिकांनी वाळू चोरी संदर्भात तक्रारी केल्या असता त्यावर महसूल विभाग फक्त अवैद्य वाळू वाहतूक तस्करावर कारवाई  होताना दिसत नसून फक्त अवैद्य वाळू जप्त करणे एवढेच वाळूसाठ्यावरच कारवाई होत असून वाळू चोरांना मोकाट सोडत असल्याचे दिसत  आजपर्यंत दिसत आहे. असे राजेंद्र भोसले यांनी निवेदनात म्हटले आहे.

महसूल विभाग हे नदीच्या पात्रातील लारीच्या साह्याने वाळू उपसा करत असलेल्या होड्या फोडणे हे कारवाई केल्याचे देखावा करत असल्याचे आम आदमी पक्षाचे सोलापूर उपाध्यक्ष राजेंद्र भोसले यांनी म्हटले आहे. हे निवेदन दि. ६ मार्च रोजी जिल्हाधिकारी व जिल्हा पोलीस प्रमुख यांना देण्यात आले होते. यानंतरही सरकोली येथे वाळू तस्कराकडून बेसुमार वाळू उपसा सुरूच असून महसूल व वाळू तस्कर यांची मिली भगत असल्याचा संशय राजेंद्र भोसले यांनी व्यक्त केला आहे.