शिवरत्न ज्युनिअर कॉलेज गादेगाव विद्यार्थी रैयान तांबोळी गोल्ड मेडल मिळवून महाराष्ट्रात पहिला
----------------------------------------------------------------------------------
रैयान तांबोळीची देशपातळीवर निवड
----------------------------------------------------------------------------------
पंढरपूर( दै. पंढरी नगरी न्युज) : पंढरपूर तालुक्यातील शिवरत्न ज्युनिअर कॉलेजचा विद्यार्थी रैयान तांबोळी गोल्ड मेडल मिळवून राज्यात प्रथम,शालेय क्रीडा स्पर्धा जळगाव येथे पार पडल्या. यामध्ये शिवरत्न ज्युनिअर कॉलेजचा रैयान तांबोळी यांनी सतरा वर्षीय वयोगटांमध्ये ४५ किलो वजन गटात राज्यात प्रथम क्रमांक पटकावला त्याने पूर्ण नलॉकआउट सामना जिंकला यानंतरच्या पुढील स्पर्धा देशपातळीवर होणार आहेत या स्पर्धेमध्ये रैयान तांबोळी घवघवीत यश संपादन केले .
याबद्दल संस्थापक अध्यक्ष उपसरपंच गणपत मोरे यांनी अभिनंदन केले व पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या रैयान तांबोळी राज्यस्तरीय स्पर्धेतील विजयामुळे राष्ट्रीय स्पर्धेसाठी जाण्याचा मार्ग मोकळा झाला आहे. या यशस्वी वाटचालीसाठी, बापूराव निकम सहशिक्षक दिपक देशमुख, नागेश कांबळे, दस्तगीर शेख, राजेंद्र मोलाणे, नियाज मुलाणी, शितल मस्के, लीना बागल ,शीतल बागल, प्राजक्ता मस्के, वर्षा मोरे ,अजय मोरे आदींनी अभिनंदन केले.