देगाव तेथून 40.000 हजार रू. किमतीच्या 15 शेळ्या अज्ञात चोरट्याकडून लंपास ◼️ शेळ्या चोरीची फिर्याद नोंदवून घेण्यास पोलिसांची टाळाटाळ बिचारा शेळीपालन शेतकरी हतबल

देगाव तेथून 40.000 हजार रू. किमतीच्या 15 शेळ्या  अज्ञात चोरट्याकडून लंपास  ◼️ शेळ्या चोरीची फिर्याद नोंदवून घेण्यास पोलिसांची टाळाटाळ बिचारा  शेळीपालन  शेतकरी हतबल

------------------------------------------------------------------------------------

पंढरपूर (दै.पंढरी नगरी न्यूज) पंढरपूर तालुक्यातील देगाव येथील संतोष तुकाराम डांगे यांच्या शेतातील घराजवळील वस्तीवर असलेल्या पत्रा शेडमधून 15 शेळ्या अज्ञात चोरट्याने हातोहात लंपास केल्याने शेतकऱ्यांमध्ये भीतीचे वातावरण पसरले आहे. पंढरपूर पासून अवघ्या चार किलोमीटर अंतरावर असलेल्या आढीव - देगाव हद्दीत राहणारे संतोष तुकाराम डांगे हे शेळीपालन व्यवसाय करून आपल्या कुटुंबाचा उदरनिर्वाह करीत होते .

रविवार दि. 12 रोजी घरासमोरील पत्राशेड मधील बंदिस्त असणाऱ्या शेळ्यांना रात्री खाण्यासाठी तुरीचा भुसा टाकून शेळ्या असलेल्या पत्राशेडच्या जाळीचा दरवाजा बंद करून झोपण्यासाठी घरी गेले होते त्यानंतर दुसऱ्या दिवशी सोमवार दि. 13 रोजी पहाटे 5 वा. सुमारास झोपेतून उठून शेळ्याचे झाडलोट करण्यासाठी गेले असता त्यांना पत्राशेड मधील एकूण 40 लहान मोठ्या शेळ्या पैकी 15 लहान मोठ्या शेळ्या कमी झाल्याचे दिसून आल्यामुळे मी घरातील लोकांना बोलावून घेऊन सदर घडलेला प्रकार दाखवला त्यानंतर घरातील आम्ही सर्व मिळून पत्राशेडची पाहणी केली असता कोणीतरी अज्ञात चोरट्यांनी पत्राशेडची जाळी उचकून बंदिस्त असलेल्या 15 शेळ्या गायब झाल्याचे निदर्शनास आले पत्रा शेडमधून 40.000 हजार रुपये किमतीच्या लहान मोठ्या 40 शेळ्या पैकी 15 लहान मोठ्या शेळ्या अज्ञात चोरट्याने लंपास केल्यामुळे संतोष डांगे या शेळीपालन शेतकऱ्यास मोठी आर्थिक झळ बसल्याची गावकऱ्यामधून चर्चा होत आहे.

संतोष डांगे यांनी यांच्या राहत्या घरासमोरून बंदिस्त पत्रा शेडमधून अज्ञात चोरट्याने पंधरा शेळ्या चोरीस गेल्याची फिर्याद तालुका पोलीस स्टेशनला दिली असून सदर घटनेचा तपास पोलीस कॉन्स्टेबल हर्षदा सुरवसे करीत आहे. शेळी पालक संतोष डांगे यांच्या पत्राशेड मधून अज्ञात चोरट्याने शेळ्या लंपास केल्याचे माहिती समजाच सकाळी श्री विठ्ठल सहकारी साखर कारखान्याचे संचालक दिनकर दाजी चव्हाण यांनी घटनास्थळी जाऊन घडलेल्या माहितीची विचारपूस केली .