पंढरपूर माधवबाग व स्वानुभूती आयुर्वेदिक पंचकर्म यांच्यावतीने मोफत तपासणी शिबिराचे आयोजन
---------------------------------------------------------------------------------
डॉ.सुमोद जोशी दाताचा दवाखाना यांचा पुढाकार ,गरजू रुग्णांनी याचा लाभ घ्यावा.
---------------------------------------------------------------------------------
पंढरपूर( दै.पंढरी नगरी न्यूज ) : पंढरपूर येथे माधवबाग पंढरपूर मिनी क्लिनिक आणि स्वानुभूती आयुर्वेदिक पंचकर्म सेंटर व दाताचा दवाखाना डॉ. सुमोद दोशी एम. डी. यांच्यावतीने हृदयरोग व रक्त तपासणी, मोफत दंत तपासणी सौ. डॉ. स्वरुप दोशी, B.D.S. यांच्यामार्फत शिबीर दिनांक १३/०२/२०२३ ते १८/०२/२०२३ पर्यत आयोजन करण्यात आले आहे. शिबीरांतर्गत E.C.G कार्डीयॅक स्टेस टेस्ट, रक्तातील Lipid Profile Test, HbA1C (तीन महिन्याची साखर), Thy - roid test. व पंचकर्म, आहार विहार, दिनचर्या याबद्दल मार्गदर्शन करण्यात येणार आहे. या शिबीराअंतर्गत सहा हजार रुपयांच्या टेस्ट फक्त २ हजारात करण्यात येणार आहेत.
सदर शिबीर हे स्वानुभूती आयुर्वेदिक पंचकर्म सेंटर व दाताचा दवाखाना डॉ. सुमोद दोशी एम. डी. श्रीनाथ फर्निचर जवळ, पंढरपूर पुणे रोड, इसबावी येथे संपन्न होणार आहे. तरी इच्छुकांनी मोबा. नं. ९४२१०४०३२८ या नंबरवर संपर्क साधावा.