वाखरीच्या अहिल्यादेवी होळकर सार्वजनिक वाचनालयामध्ये जागतिक पुस्तक दिन साजरा..
------------------------------------------------------------------------------------
पंढरपूर (पंढरी नगरी न्यूज) ; आज दिनांक २३ एप्रिल २०२३ रोजी अहिल्यादेवी होळकर सार्वजनिक वाचनालय मध्ये जागतिक पुस्तक दिन निमित्त भव्य असे पुस्तक प्रदर्शन भरविण्यात आले होते. या प्रदर्शनामध्ये जवळजवळ ८० ते १०० विद्यार्थ्यांनी सहभाग नोंदवून सुट्टीतील पुस्तक वाचण्याचा आनंद घेतला. सर्व विद्यार्थी उपस्थित राहण्यासाठी गावातील पालकांनी मोलाचे सहकार्य केले.तसेच या दिवसाचे औचित्य साधून वाचनालय मध्ये प्रिंटर खरेदी करण्यात आलेला होता त्याचे उद्घाटन करण्यात आले. आणि या प्रिंटर मार्फत वर्षभरात वाचक प्रेमी साठी मोफत ५० झेरॉक्स देण्याचे सर्वानुमते ठरले तसेच इतर गावातील लोकांना झेरॉक्स साठी एक रुपया एक प्रतीसाठी घेण्याचे ठरले त्यामुळे वाचनालयात वाचक मोठ्या प्रमाणात उपलब्ध होण्यास मदत होईल असा सर्व उपस्थित व्यक्तींनी विचार व्यक्त केला.
या कार्यक्रमासाठी प्रमुख पाहुणे वाखरी गावचे उपसरपंच मा सोमनाथ पोरे , पत्रकार नवनाथ पोरे , वाचनालयाचे अध्यक्ष पांडुरंग पिसे, वाचनालयाचे सदस्य इब्राहिम मुजावर ,महादेव गायकवाड, नारायण गायकवाड , ज्योतीराम पोरे व गावातील ग्रंथालय प्रेमी वाचक वर्ग उपस्थित होते या कार्यक्रमाचे प्रास्ताविक वाचनालयाचे सचिव ज्योतीराम गायकवाड सर यांनी केले.