मुख्यमंत्री शिंदे -फडणवीस सरकारने विविध कार्यलयातील कंत्राटी पद्धतीचा अध्यादेश त्वरित मागे घ्यावा - संभाजी ब्रिगेडची निवेदनाद्वारे आक्रमक मागणी,

मुख्यमंत्री शिंदे -फडणवीस सरकारने विविध कार्यलयातील कंत्राटी पद्धतीचा अध्यादेश त्वरित मागे घ्यावा - संभाजी ब्रिगेडची निवेदनाद्वारे आक्रमक मागणी,

------------------------------------------------------------------------------------

पंढरपूर (दै.पंढरी नगरी न्यूज)  महाराष्ट्रात कंत्राटी पद्धतीने विविध कार्यालयातील पदभरतीबाबत दि.14 मार्च 2023 तारखेला काढलेला सेवा पुरवठादार संस्थाची निवड करणारा शासन निर्णय क्रमांक काआआ2017/प्र.क्र.233/कामगार -8 मागे घेण्यांबाबत संभाजी ब्रिगेडच्या वतीने पंढरपुर प्रांताधिकारी गजानन गुरव यांना निवेदन देण्यांत आले.             

महाराष्ट्रातील बेरोजगारीचा मोठा उद्रेक उसळलेला असताना अनेक विद्यार्थाना शासनाकडून मेगाभरतीचं गाजर दाखवायचं आणि दुसरीकडे कत्राटी पध्दतीने भरतीचा शासन निर्णय काढुन एक प्रकारे सुशिक्षित बेरोजगारांची थट्टा करण्यांचं काम सरकार करत आहे.आपन काढलेला जीआर म्हणजे महाराष्ट्रातील शासकिय नोकऱ्या संपवण्यांची नांदीच आहे.महाराष्ट्रातील तरुणांमध्ये प्रचंड मोठी अस्वस्थता पसरली आहे.महाराष्ट्रात आराजगता निर्मान होण्यास वेळ लागणार नाही.तरी सदर शासन निर्णय ताबडतोब मागे घ्यावा अन्यथा निर्माण होणाऱ्या कायदा व सुवेवस्थेस प्रशासन जबाबदार राहील.          

यावेळी संभाजी ब्रिगेडचे पुणे विभागिय अध्यक्ष किरणराज घाडगे,जिल्हा अध्यक्ष सचिन जगताप, पंढरपुर तालुकाध्यक्ष दत्ता ताड, माळशिरस तालुकाध्यक्ष दिगंबर मिसाळ, सोशल मिडिया प्रमुख प्रमोद जगदाळे,विधानसभा अध्यक्ष अमोल कुंभार, उपाध्यक्ष प्रकाश गाजरे,शहर अध्यक्ष स्वागत कदम,किरण जाधव, सिद्धेश्वर यादव उपस्थित होते.