मराठा सेवा संघाचे राष्ट्रीय अध्यक्ष पुरुषोत्तम खेडेकर यांची स्व. संजय - सविता स्मृती सार्वजनिक वाचनालयास सदिच्छा भेट.
-----------------------------------------------------------------------------------
मंगळवेढा( दै.पंढरी नगरी न्युज ) : मंगळवेढा शहरातील नवीन पाण्याच्या टाकीजवळ कृष्णा नगर येथील स्व. संजय- सविता स्मृति सार्वजनिक वाचनालयास मराठा सेवा संघाचे राष्ट्रीय संस्थापक अध्यक्ष पुरुषोत्तम खेडेकर यांनी आज दि.६ .रोजी सदिच्छा भेट दिली. ज्येष्ठ साहित्यिक रणजीत देसाई यांच्या पुण्यस्मरण दिनाचे औचित्य साधून साहित्यिक रणजित देसाई यांच्या प्रतिमेचे पूजन मराठा सेवा संघाचे राष्ट्रीय अध्यक्ष पुरुषोत्तम खेडेकर यांच्या हस्ते प्रथम पुष्पहार घालून अभिवादन करण्यात आले.
यावेळी बीड येथील प्रा .अर्जुन तनपुरे उपस्थित होते या सदिच्छा भेटीदरम्यान वाचनालयास खेडेकर यांनी ग्रंथसंच भेट देण्यात आले. सदिच्छा भेटीदरम्यान वाचनालयाची बांधण्यात आलेली दिमाखदार नविन सुंदर इमारत, ग्रंथसंपदा, फर्निचर संदर्भ सेवा नियतकालिके इ. वाचनालयाद्वारे आयोजित विविध उपक्रम पाहून कौतुक केले. स्व .संजय सविता स्मृती सार्वजनिक वाचनालयाच्या वतीने अध्यक्ष राकेश गायकवाड यांनी पुरुषोत्तम खेडेकर व अर्जुन तनपुरे बीड यांचा ग्रंथ भेट देऊन स्वागत व सत्कार करण्यात आला.
यावेळी पुरुषोत्तम खेडेकर यांनी आपल्या बोलताना म्हणाले की ,आजच्या तरुण पिढीतील युवकांनी लिहिते व्हावे, वाचते व्हावे असा संदेश देऊन विविध स्पर्धा परीक्षेच्या माध्यमातून युवकांनी यश मिळवावे असे प्रतिपादन मराठा सेवा संघाचे राष्ट्रीय अध्यक्ष पुरुषोत्तम खेडेकर यांनी केले ,कार्यक्रमास गणेश यादव, दिलीप जाधव ,प्रकाश मुळीक विठ्ठल यादव ,मारुती गवळी वाचनालयाचे पदाधिकारी इ.मान्यवर उपस्थित होते .कार्यक्रमाचे आभार व प्रास्ताविक वाचनालयाचे अध्यक्ष राकेश गायकवाड यांनी केले.