पती-पत्नीने घरात घुसून महिलेच्या गळ्यातील मंगळसुत्र जबरदस्तीने नेल्या प्रकरणी गुन्हा दाखल..

पती-पत्नीने घरात घुसून महिलेच्या गळ्यातील मंगळसुत्र  जबरदस्तीने नेल्या प्रकरणी गुन्हा दाखल..

----------------------------------------------------------------------------------

मंगळवेढा (पंढरी नगरी न्यूज) : मारापूर येथे दोघांनी रात्री घरात प्रवेश करुन काठीने हातावर व पाठीवर मारुन एका महिलेच्या गळ्यातील 30 हजार रुपये किंमतीचे सोन्याचे मंगळसुत्र व रोख 5 हजार रुपये घेवून गेल्या प्रकरणी रतन सिध्देश्‍वर भुसे,मंगेश सिध्देश्‍वर भुसे या पती-पत्नी विरुध्द गुन्हा दाखल झाला आहे.

पोलीस सुत्रांनी दिलेली माहिती अशी, यातील फिर्यादी स्वप्नाली बाबासाहेब माने (वय 28, रा.मारापूर) या दि.9 रोजी रात्री 10.30 वाजता राहते घरात फिर्यादी व त्यांचा मुलगा विराज व मुलगी पौर्णिमा असे घरात झोपले असताना घराची कडी वाजविल्याने फिर्यादीने दरवाजा उघडला असता वरील आरोपीने घरात येवून काठीने फिर्यादीच्या हातावर व पाठीवर मारुन केस धरुन जमिनीवर खाली पाडून लाथा बुक्क्यांनी मारहाण करुन फिर्यादीच्या गळ्यातील 1 तोळ्याचे  30 हजार रुपये किंमतीचे सोन्याचे मंगळसुत्र ओढून घेवून निघून गेले. तसेच जाताना भांड्याच्या कपटावर ठेवलेले रोख 5 हजार रुपये नेले. तू पोलीस ठाण्यात जावून तक्रार दिली तर बघून घेण्याची धमकी दिली असल्याचे दिलेल्या फिर्यादीत म्हटले आहे.